Feni| Dainik Gomantak
गोवा

Feni Export: ...यामुळे गोव्याचे फेणी डिस्टिलर्स जपानमध्ये निर्यातीस उत्सुक

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ : सरकारकडून मदतीची अपेक्षा; वेगवेगळ्या देशांत जाते गोव्याची फेणी

दैनिक गोमन्तक

Goa Feni Export: गोवा फक्त बीचसाठीच नाही, तर फेणी दारूसाठीदेखील प्रसिद्ध आहे. गोवा सरकारकडून 2009 मध्ये या फेणीला जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) प्रमाणपत्र मिळाले, तर कालांतराने सरकारने या फेणीस हेरिटेज दारूचा दर्जा दिला.

याच फेणीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या जपानमध्ये निर्यात करण्यास स्थानिक फेणी डिस्टिलर्स हे उत्सुक आहेत. त्यासाठी गोवा सरकारने डिस्टिलर्सना मदत करावी, अशी विनंती संबंधितांनी प्रशासनाकडे केली आहे.

यासंदर्भात आम्ही राज्य सरकारकडे इच्छा प्रकट केली असून जपानमध्ये फेणी निर्यात करण्यास तयार आहोत. यासाठी सरकारने दूतावासाकडे संपर्क साधून डिस्टिलर्सच्या शिष्टमंडळास तिथे नेण्याची व्यवस्था करावी.

जेणेकरून गोव्याच्या फेणीची माहिती व प्रसार करुरून जपानमध्ये निर्यात करता येईल. तसेच आम्ही व्यापारी सदस्य आमच्या प्रवासाचा खर्च उचलण्यास तयार आहोत, असे अखिल गोवा फेणी डिस्टिलर्स अँड बॉटलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गुरुदत्त भक्ता यांनी आवाहन केले आहे.

हस्तकलेच्या स्पिरीटला जपानकडून जास्त महत्त्व....

  •   राज्य सरकारने फेणी डिस्टिलर्सना जपानमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.

  •   जपान देश हस्तकलेच्या स्पिरीटला जास्त महत्त्व देतो व त्याचे त्यांना कौतुक आहे.

  •   गोव्याची फेणी जपानमध्ये निर्यात करणे आदर्श ठरू शकतो, असे असोसिएशनचे मत.

  •   जपानसोबत निर्यात सुरू झाल्यास याचा आर्थिक फायदा संबंधितांना होईल.

  •   सध्या डिस्टिलर्स हे अमेरिका, दुबई, कॅनडा अशा देशांत फेणी निर्यात करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT