Goa's G-TECH Multiverse Technologies Expo Dainik Gomantak
गोवा

Goa G-TECH Expo: पणजीत सर्वात मोठ्या दोन दिवसीय तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, नोंदणी सुरु

सर्वांना मोफत प्रवेश

Pramod Yadav

Goa's G-TECH Multiverse Technologies Expo: राज्याची राजधानी पणजीत दोन दिवसीय आधुनिक तंत्रज्ञान संबधित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉम्प्युटर डिलर्स फोरम ऑफ गोवा यांच्या वतीने आयोजित केले जाणारे हे राज्यातील सर्वात मोठे प्रदर्शन असेल असा दावा केला जात आहे. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरु झाली आहे.

G-Tech तंत्रज्ञान प्रदर्शन 06 आणि 07 ऑक्टोबर या दोन दिवशी मेन्झेस ब्रागांझा हॉलमध्ये भरवले जाईल. यात आयसीटी प्रोडक्ट, रोबोटीक्स, मल्टीमिडिया, ऑडिओ-व्हिडिओ, आयटी शिक्षण आणि कौशल्य, क्लाऊड कॉम्प्युटींग, आयटी प्रशिक्षण, टेलिकॉम या क्षेत्रातील प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. तसेच, याठिकाणी प्रश्न मंजुषा आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

या प्रदर्शनासाठी नोंदणी सुरु झाली असून, कॉम्प्युटर डिलर्स फोरम ऑफ गोवाच्या cdfg.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT