Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

गोडसे नव्हे, महात्मा गांधींच्या विचारसरणीचे अनुसरण करतात गोमन्तकीय; अमित पाटकर

Goa Politics: शांतता आणि सलोखा राखण्यासाठी आपण सर्वांनी सदैव सतर्क राहायला हवे. संकटकाळी आपण सर्वांनी एकामेकाना साथ दिली पाहिजे, असे पाटकर म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: गोमंतकीयांनी नेहमीच सर्व धर्मांचा आदर करून जातीय सलोखा पाळला आहे. जत्रा, फेस्त आणि ईद उत्सवात सर्व धर्मातील गोमंतकीय सहभागी होतात. गोमंतकीय गोडसेच्या नव्हे तर महात्मा गांधींच्या विचारसरणीचे पालन करतात याचा मला अभिमान आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

हे अत्यंत दुर्दैवी आहे की काही समाजकंटक सत्तेत असलेल्या पक्षाच्या पाठबळाच्या जोरावर गोव्यात जातीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहखात्याचा ताबा असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काणकोण आणि कुंकळ्ळी येथील घटनांबाबत पूर्णपणे मौन बाळगून आहेत, ही धक्कादायक बाब आहे, असेही पाटकर म्हणाले.

शांतता आणि सलोखा राखण्यासाठी आपण सर्वांनी सदैव सतर्क राहायला हवे. संकटकाळी आपण सर्वांनी एकामेकाना साथ दिली पाहिजे, असे अमित पाटकर म्हणाले.

महात्मा गांधी यांच्या मृत्यूला ७६ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांनी अहिंसेची शिकवण दिल्याने जग त्यांचे आजही स्मरण करत आहे. आपण हिंसाचाराला बळी पडू नये, असे प्रतिपादन अमित पाटकर यांनी केले.

आपण पृथ्वी मातेची लेकरे आहोत आणि जंगल, नद्या, शेती, डोंगर, पर्वत यांचे रक्षण करून तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. गोव्यात जमिनींचे रुपांतरण करून पृथ्वी मातेच्या होत असलेल्या विनाशावरून लक्ष विचलित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला.

मी सर्व धर्मांतील गोमंतकीयांना नम्रपणे आवाहन करतो की, फुटीरतावादी आणि असामाजिक घटकांकडून भडकवीण्याचा प्रयत्न हाणून पाडा. आपली संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे, असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT