Goa youth drugs Dainik Gomantak
गोवा

Telemanus Service : गोव्यातील व्‍यसनांमध्‍ये गुरफटलेल्‍या तरुण पिढीसाठी ‘टेलीमानस’ सेवेचा आधार

Goa youth drugs: मानसिक तणावाखाली असलेल्‍या लोकांना मदत मिळावी, यासाठी टेलीमानस सेवा काम करते. कुठलीही व्‍यक्‍ती मानसिक तणावाखाली असल्‍यास त्‍यांना तात्‍काळ मदत मिळावी यासाठी या सेवेद्वारे त्‍यांना मदत दिली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : गोमंतकीय युवक अलीकडे ड्रग्‍सच्‍या आहारी जाऊ लागले आहेत. त्‍यांना त्‍यातून बाहेर काढणे हे एक मोठे आव्‍हान बनले आहे. त्‍यासाठी वेगवेगळ्‍या संस्‍था कार्यरत आहेत.

मानसिक तणावाखाली असलेल्‍या लोकांना मदत मिळावी यासाठी टेलीमानस सेवा काम करते. कुठलीही व्‍यक्‍ती मानसिक तणावाखाली असल्‍यास त्‍यांना तात्‍काळ मदत मिळावी यासाठी या सेवेद्वारे त्‍यांना मदत दिली जाते.

हे तणावाखाली असलेले लोक फोनवरून या सेवेच्‍या केंद्राशी संपर्क साधतात. त्‍यावेळी या सेवेअंतर्गत नियुक्‍त केलेले समुपदेशक त्‍यांना योग्‍य तो सल्‍ला देऊन साहाय्‍य करतात. गरज पडल्‍यास त्‍यांच्‍यावर औषधोपचारही केले जातात.

दक्षिण गोव्‍यात हे केंद्र दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळातून चालते. या केंद्राच्‍या प्रमुख डॉ. स्‍नेहा पोकळे यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी सांगितले की, अशा प्रकारे फोन करणाऱ्यांमध्‍ये काहीवेळा ड्रग्‍स ॲडिक्‍टस्‌ही असतात.

त्‍यातील बरेचजण २० ते ४० वर्षे वयोगटातील असतात. अशा व्‍यक्‍तींना योग्‍य ते मार्गदर्शन करून त्‍यांना या व्‍यसनापासून परावृत्त करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. कित्‍येकदा त्‍यांच्‍यावरही उपचारही केले जातात.

टेलीमानस सेवेचा होतो चांगला फायदा

मानसिक तणावाखाली असलेली व्‍यक्ती कित्‍येकवेळा आम्‍हाला मदतीसाठी फोन करते. पण नंतर माहिती जाणून घेतल्‍यावर यातील कित्‍येक जण ड्रग्‍सच्‍या आहारी गेल्‍याचे समजते. ज्‍यांना या व्‍यसनातून बाहेर यायचे असते, त्‍यांना टेलीमानस सेवा चांगले मार्गदर्शन करते. याचा त्‍यांना चांगला फायदाही होतो, असे डॉ. स्‍नेहा पोकळे म्‍हणाल्‍या.

कित्‍येकवेळा तणावाखाली असलेली व्‍यक्‍ती तणाव हलका करण्‍यासाठी ड्रग्‍सच्‍या आहारी जाते किंवा कित्‍येकदा ड्रग्‍सचे सेवन केल्‍यामुळेही या व्‍यक्‍ती तणावाखाली आलेल्‍या असतात. अशा प्रत्‍येक व्‍यक्‍तीची समस्‍या जाणून घेतल्‍यावरच त्‍यांच्‍यावर योग्‍य उपचार केले जातात, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT