Russia Ukraine War Dainik Gomantak
गोवा

युक्रेनमध्ये अडकलेली गोमंतकीय विद्यार्थिनी भारतात दाखल

अन्य तीन विद्यार्थी रोमेनियन विमानतळावर पोहोचले, लवकरच भारतात येण्याच्या तयारीत

दैनिक गोमन्तक

मडगाव : युक्रेनमध्ये अडकलेल्या 9 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी रोमेनियात सुखरुपपणे पोहोचले असून त्यापैकी रुपल गोसावी ही विद्यार्थीनी आज नवी दिल्लीत दाखल झाल्याची माहिती राज्य सरकारच्या एनआरआय खात्यातून मिळाली आहे.

एनआरआय संचालक अँथनी डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रोमेनियात पोहोचलेल्या चार विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी तर तीन विद्यार्थिनी असून एक विद्यार्थी आणि अन्य दोन विद्यार्थिनी रोमेनियाच्या विमानतळावर त्यांना भारतात घेऊन येणाऱ्या विमानांची वाट पाहत थांबले आहेत. डिसोझा यांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना याबद्दल माहिती दिली. त्याशिवाय अन्य सरकारी अधिकाऱ्यांनीही काही पालकांच्या भेटी घेतल्या. (Russia Ukraine War News Updates)

अन्य चार गोमंतकीय (Goa) विद्यार्थिनी हंगेरीच्या सीमेजवळ उभारलेल्या आश्रय कॅम्पमध्ये असून लवकरच त्या हंगेरी देशातून भारतात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. या चार विद्यार्थिनीही रोमेनियात येण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र वाटेतील एका शहरावर रशियन (Russia) फौजांनी कब्जा केल्याने त्यांना हंगेरीच्या दिशेने वळविण्यात आले, असे डिसोझा यांनी सांगितले.

युक्रेनमध्ये (Ukraine) कित्येक गोमंतकीय विद्यार्थी शिकत असले तरी त्यापैकी आतापर्यंत त्यातील 9 विद्यार्थ्यांनीच गोव्यातील एनआरआय आयुक्तांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यातील सात विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्याचे प्रयत्न कधीचेच सुरु झाले आहेत, अशी माहिती राज्य एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली.

या 9 जणांपैकी 7 विद्यार्थिनी आहेत तर दोन विद्यार्थी आहेत. यातील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी प्रत्यक्ष जिथे युद्ध भडकून बॉम्ब वर्षाव चालू अशा शहरात अडकून पडल्यामुळे तेथील परिस्थिती निवळल्यावरच त्यांना बाहेर काढणे शक्य होईल, अशी माहिती या कार्यालायतून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT