Cyber Crime  Dainik Gomantak
गोवा

पोलंडमध्ये नोकरीच्या आमिषाने गोव्याच्या तरुणाला 7 लाखांचा गंडा

पैसे मिळताच आरोपीने युवकाशी संपर्क तोडला.

दैनिक गोमन्तक

पणजी: पोलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून दक्षिण गोव्यातील एका युवकाला तब्बल 7 लाख 41 हजारचा गंडा घालण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने गुन्हा शाखेच्या सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने युवकाला पोलंडमधील एका कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवले आणि नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे घेतले. आरोपीने 7 डिसेंबर 2021 ते 9 फेब्रुवारी 2022 दरम्यान नोंदणी शुल्क, जीएसटी, विमान तिकिटे आदि खर्चासाठी त्याच्याकडून 7 लाख 41 हजार आपल्या खात्यात जमा करून घेतले.

पैसे मिळताच आरोपीने युवकाशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच युवकाने तक्रार नोंदवली. सायबर गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT