Goan Creator Rudra AT The National Creators Award 2024 In New Delhi Dainik Gomantak
गोवा

Creators Award: दिल्लीची पहिलीच भेट निराशाजनक, गोवा व कोंकणीचे प्रतिनिधित्व करणार रुद्र म्हणाला 'नेक्स्ट टाईम'

The National Creators Award 2024: रुद्रने दिल्ली भेट आणि पुरस्कार सोहळ्याचा अनुभव शेअर केला आहे.

Pramod Yadav

The National Creators Award 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील पहिल्या नॅशनल क्रिएटर्स पुरस्कार प्रदान केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम पार पडला. डिजिटल कंटेटच्या माध्यमातून सकारात्मक सामाजिक बदल आणि नाविन्य घडविण्याचा प्रयत्न केलेल्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या पुरस्कार कार्यक्रमासाठी गोव्यातील रुद्र आवतार या नावाने इन्स्टाग्राम हँडलवर सक्रिय असलेल्या याला आमंत्रण देण्यात आले होते. रुद्रने दिल्ली भेट आणि पुरस्कार सोहळ्याचा अनुभव शेअर केला आहे.

"माझी पहिलीच 'नवी दिल्ली' भेट रोमांचक पण थोडी निराशाजनक होती. राष्ट्रीय पातळीवर 'गोवा' आणि 'कोंकणी'चे एकट्याने प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मला प्रथमच ‘द नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड 2024’ साठी सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर-भारत या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते. या श्रेणीत मी देशात अव्वल स्थान मिळवले पण ट्रॉफी जिंकण्यात मला यश आले नाही."

"140 कोटी लोकसंख्येच्या देशात भारतातील सुमारे 1.75 लाख क्रिएटर्समध्ये मी पहिल्या रांगेत पोहोचलो हे देखील कमी नाही. पुढीलवेळी निश्चितपणे चांगला निकाल असेल. तुमच्या अमूल्य मत आणि आशीर्वादांबद्दल धन्यवाद," अशी पोस्ट रुद्रने इन्स्टाग्रामवर लिहली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी 23 विविध विभागात डिजिटल क्रिएटर्सना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासाठी 200 जणांना नामांकन मिळाले होते.

पुरस्कार सोहळ्याला उपस्थित क्रिएटर्सना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही काही सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचू शकतात असे म्हणाले. व्होकल फॉर लोकलचे तुम्ही सर्व ब्रँड अँबेसेडर असल्याचे मोदी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT