गोवा

पश्चिम विभाग स्पर्धा ; गोव्याचे बॅडमिंटनपटू तीन वर्षांनंतर ‘कोर्ट’वर

19 वर्षांखालील, सीनियर संघाची घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पश्चिम विभाग आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धा (Badminton) तब्बल तीन वर्षांनंतर होत आहे, त्यानिमित्त गोव्याच्या 19 वर्षांखालील आणि सीनियर गटातील खेळाडू कोर्टवर उतरतील. पुरुष व महिला गटातील संघ सोमवारी जाहीर करण्यात आले.

पश्चिम विभाग स्पर्धा 7 ते 10 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील परभणी येथे खेळली जाईल. गोव्याच्या वयोगट आणि सीनियर संघाने स्पर्धेसाठी कांपाल येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलातील खेलो इंडिया केंद्रात सराव केला. खेळाडूंना गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे यांनी निरोप समारंभात शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते खेळाडूंना किट वितरित करण्यात आले.

चांगल्या कामगिरीची अपेक्षा

गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली आहे. त्यांनी सांगितले, की. ‘‘आंतरराज्य पश्चिम विभाग बॅडमिंटन स्पर्धा तीन वर्षांनंतर होत आहे आणि सर्व खेळाडू अत्यंत उत्साही आहेत. खेलो इंडिया केंद्राचे प्रशिक्षक इरफान खान, संघटनेचे प्रशिक्षक अर्जुन चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगली तयारी केली आहे. दहा दिवसीय स्पर्धापूर्व शिबिरात खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला खेळाडूंकडून शानदार कामगिरी अपेक्षित आहे.’’

गोव्याचे बॅडमिंटन संघ

19 वर्षांखालील मुली: जान्हवी महाले, निधी देसाई, प्रतिष्ठा शेणॉय, सिनोव्हिया डिसोझा, मिनोष्का परेरा.

19 वर्षांखालील मुलगे: निशांत शेणॉय, अनीश कामत, यश देसाई, आर्यमान सराफ, यश हळर्णकर.

महिला: अंजना कुमारी, यास्मिन सय्यद, आरोही कौठणकर, अनार सिंगबाळ, नेहा सहकारी.

पुरुष: तेजन फळारी (कर्णधार), करण धावसकर, अयान शेख, उमाकांत सरगे, अर्जुन फळारी.

अधिकारी: अनुप कुशवाह (प्रशिक्षक), रामनाथ गावकर (स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक), दिलीप हळर्णकर (व्यवस्थापक), अमन राऊत देसाई (पंच).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT