ZP Election Dainik Gomantak
गोवा

ZP Election: डिचोलीत उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्‍ये! चारही मतदारसंघात 31 हजार 723 मतदार

ZP Election 2025: डिचोली तालुक्यातील चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ६२ हजार ९० मतदार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: डिचोली तालुक्यातील चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ६२ हजार ९० मतदार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. पुरुष मतदार ३० हजार ३६७ तर महिला मतदार ३१ हजार ७२३ आहेत. यावरून आगामी झेडपी निवडणुकीत महिलांचे मत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होते.

लाटंबार्से जिल्हा पंचायत मतदारसंघात लाटंबार्से, साळ, मेणकुरे, अडवलपाल आणि मुळगाव या पंचायती आहेत. तेथे ७६०५ पुरुष व ७७४७ महिला मिळून १५,३५२ मतदार नोंदले गेले आहेत. मये जिल्हा पंचायत मतदारसंघात मये-वायंगिणी, शिरगाव, चोडण-माडेल आणि नार्वे पंचायतींचा समावेश आहे. या मतदारसंघात ७७२२ पुरुष व ८१३१ महिला मिळून १५,८५३ मतदार आहेत.

पाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात आमोणे, न्हावेली, सुर्ल, वेळगे आणि पाळी-कोठंबी या पंचायतींचा समावेश आहे. तेथे ७१२८ पुरुष व ७४९३ महिला मिळून १४,६२१ मतदार आहेत. चारही मतदारसंघांतील आकडेवारीवरून महिला मतदारांचा वरचष्मा दिसून येत आहे. त्‍यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कारापूर-सर्वणमध्‍ये सर्वाधिक मतदार

तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी कारापूर-सर्वण मतदारसंघात सर्वाधिक तर पाळी मतदारसंघात सर्वांत कमी मतदार आहेत. कारापूर-सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघात कारापूर-सर्वण, कुडणे, पिळगाव आणि वन-म्हावळिंगे या चार पंचायतींचा समावेश असून, तेथे ७९१२ पुरुष व ८३५२ महिला मिळून १६,२६४ मतदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

SCROLL FOR NEXT