Goa zp election :
Goa zp election : 
गोवा

मगोचे १२ उमेदवार जाहीर

गोमंतक वृत्तसेवा

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी युती करण्याचे केलेले प्रयत्न धूसर होत चालले आहेत. मगोने व काँग्रेसने १२ उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली असली, तरी काही मतदारसंघात त्यांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत.

त्यामुळे काँग्रेस व मगो हे युती करण्याची असलेली शक्यता मावळली आहे. मोरजी व कुर्टी मतदारसंघात काँग्रेस व मगो आमने सामने आले आहेत. अर्ज सादर करण्याच्या तिसऱ्या दिवशी १२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे एकूण उमेदवारांची संख्या २१ झाली आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार आज तिसऱ्या दिवशी उत्तर जिल्हा पंचायतीच्या हळदोणे मतदारसंघातून २, तर धारगळ व होंडामधून प्रत्येकी एक मिळून चार अर्ज आले आहेत. दक्षिण जिल्हा पंचायतीच्या दवर्ली, रिवण, शेल्डेमधून प्रत्येकी दोन तर कुडतरी व नावेली मतदारसंघातून प्रत्येकी एक मिळून ८ अर्ज आले आहेत.

दाखल झालेल्या अर्जदारांमध्ये धारगळ - पुंडलिक मदन धारगळकर (अपक्ष), हळदोणे - मनिषा नाईक (भाजप) व प्रवंधना मयेकर (भाजप), होंडा - गणपत पांडुरंग गावकर (अपक्ष), दवर्ली - उल्हास यशवंत तुयेंकर (भाजप) व विद्याधर विठ्ठल आर्लेकर (भाजप), कुडतरी - ब्रिंडा मिंगेलिन्हा सिल्वा (आम आदमी पक्ष), नावेली - मतिल्डा अँथनी डिसिल्वा (आम आदमी पक्ष), रिवण - जोस जासिंतो आफोन्सो (अपक्ष) व संदिप गणेश नाईक (आम आदमी पक्ष), शेल्डे - प्रमोद देवप्पा गांवस देसाई (भाजप) व सिद्धार्थ श्रीनिवास देसाई (भाजप) यांचा समावेश आहे.

आतापर्यंत ५० मतदारसंघांपैकी अजून ३७ मतदारसंघामध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उत्तर जिल्ह्यात १८ तर दक्षिण जिल्ह्यातील १९ मतदारसंघांमध्ये गेल्या तीन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. १३ मतदारसंघातून २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तालुक्यातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आज १२ उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. दुसरी उद्या किंवा परवापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी मगोचे उमेदवार नसतील तेथे विरोधी पक्षाचे किंवा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचे मगोने ठरविले आहे. काँग्रेस व मगो यांच्यात मतदारसंघ वाटपाबाबत चर्चा न झाल्याने दोघांनी एकाच मतदारसंघात आपापले उमेदवार उभे केले आहेत.

दरम्यान, मगोने काल म्हार्दोळ येथील महालसेचे दर्शन घेऊन उमेदवारी निवड व प्रचाराला सुरुवात केली. पक्षाने आज १२ उमेदवारांची यादी जाहीर केली असून उर्वरित यादी येत्या उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता असल्याचे पक्षाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी माहिती दिली.

मगो पक्ष उमेदवारी यादी
उत्तर गोवा -

तोरसे - प्रियंका संदेश महाले - महिला सर्वसाधारण
धारगळ - आत्माराम बाळकृष्ण धारगळकर (अनुसूचित जाती)
मोरजी - श्रीधर मांद्रेकर (सर्वसाधारण)
चिंबल - संदीप वेर्णेकर (सर्वसाधारण)
मये - नारायण तारी (सर्वसाधारण)
कारापूर सर्वण - योगेश दत्ता पेडणेकर (इतर मागासवर्गीय)

दक्षिण गोवा -
बेतकी - विश्‍वजित नाईक (इतर मागासवर्गीय)
कुर्टी - प्रिया चारी (महिला इतर मागासवर्गीय)
वेलिंग प्रियोळ - दामोदर नाईक (इतर मागासवर्गीय)
कवळे - गणपत नाईक (इतर मागासवर्गीय)
बोरी - बाबुराव सालेलकर (इतर मागासवर्गीय)
शिरोडा - मान्युएल क्रुझ (अनुसूचित जमाती)
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT