Reshma Bandodkar & Siddharth Gauns Dessai Chairpersons Dainik Gomantak
गोवा

जिल्हा पंचायतीचे नवे कारभारी! रेश्मा बांदोडकर उत्तर गोवा तर सिद्धार्थ गावस देसाई दक्षिण गोव्याच्या अध्यक्षपदी विराजमान

Reshma Bandodkar & Siddharth Gauns Dessai Chairpersons: गोव्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निडणुकीत सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या समर्थित उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.

Manish Jadhav

पणजी: गोव्यात नुकतीच जिल्हा पंचायतीची निवडणुक पार पडली. सत्ताधारी भाजपने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. भाजपने 29 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. यातच आता गोव्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निडणुकीत सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या समर्थित उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी रेश्मा बांदोडकर यांची, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ गावस देसाई यांची निवड झाली.

उत्तर गोवा जिल्हा पंचायत: बांदोडकर-च्यारी जोडी विजयी

उत्तर गोवा (North Goa) जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रेश्मा बांदोडकर यांनी बाजी मारली. त्यांची निवड होताच समर्थकांनी मोठा जल्लोष केला. त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष पदासाठी नामदेव च्यारी यांची निवड करण्यात आली. उत्तर गोव्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हे नवीन नेतृत्व कटिबद्ध असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हा पंचायत: भाजपचे वर्चस्व कायम

तसेच, दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा पंचायतीमध्येही भाजपने आपले वर्चस्व राखले. भाजपचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ गावस देसाई यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांच्या निवडीमुळे दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उपाध्यक्ष पदासाठी अंजली वेळीप यांची निवड करण्यात आली असून महिला प्रतिनिधीला मिळालेल्या या संधीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा

दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये नवीन अध्यक्षांची निवड झाल्यामुळे आता जिल्हा स्तरावरील विकासकामांना वेग येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जिल्हा पंचायतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून, सरकारच्या जनहितकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya: ..हाच तो दिवस! शुभवार्ता मिळणार; 'या' राशींनी तयार रहा

Bajirao Peshwa: निजाम पुण्यात घुसला, बाजीरावांनी आपला मोर्चा औरंगाबादकडे वळवला; अपराजित सेनापतीची ऐतिहासिक लढाई

क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानच्या स्टार खेळाडूला अटक, फार्म हाऊसमध्ये मोलकरणीवर केला अत्याचार

Margao: मडगाव पालिकेच्या 'तिठ्या'वरच जुगाराचा अड्डा; सायंकाळ झाली की 'गडगडा' सुरू! प्रशासनाची डोळेझाक

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

SCROLL FOR NEXT