Goa ZP Election Date Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election Date: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत मोठी बातमी, तारीख ढकलली 7 दिवसांनी पुढे; काय कारण? Watch Video

Goa Zilla Panchayat Election Date: साहाय्‍यक निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात येणार असल्‍यामुळे १३ डिसेंबर रोजी निश्‍चित केलेली निवडणूक २० डिसेंबर रोजी घेण्‍याचे निश्‍चित केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नव्‍याने नियुक्त केलेल्‍या साहाय्‍यक निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात येणार असल्‍यामुळे १३ डिसेंबर रोजी निश्‍चित केलेली जिल्‍हा पंचायत निवडणूक २० डिसेंबर रोजी घेण्‍याचे पंचायत खात्‍याने निश्‍चित केले आहे. पंचायत सचिव चेष्‍ठा यादव यांनी मंगळवारी याबाबतचा आदेश जारी केला.

२०२७ मध्‍ये होणाऱ्या राज्‍य विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाणारी जिल्‍हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजी घेण्‍याचे सरकारने निश्‍चित केले होते. निवडणुकीसंदर्भातील प्रभाग फेररचना आणि आरक्षणाची प्रक्रिया पार पडल्‍यानंतर पंचायत खात्‍याने मतदारसंघनिहाय मामलेदार आणि उपजिल्‍हाधिकाऱ्यांची निवडणूक अधिकारी म्‍हणून नियुक्तीही केली होती.

त्‍यातच राज्‍यात गेल्‍या काही दिवसांपासून ‘एसआयआर’ची प्रक्रिया सुरू केली असून, मामलेदार आणि उपजिल्‍हाधिकारी त्‍या कामात व्‍यस्‍त आहेत. त्‍यामुळे पंचायत खात्‍याने नुकतीच त्‍यांच्‍या जागी नव्‍या साहाय्‍यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्‍यासाठी त्‍यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्‍यामुळे १३ डिसेंबर रोजी निश्‍चित केलेली निवडणूक सात दिवसांनी पुढे ढकलत ती २० डिसेंबर रोजी घेण्‍याचे पंचायत खात्‍याने निश्‍चित केले आहे.

भाजपचे उमेदवार पुढील आठवड्यात

दरम्‍यान, सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी हे पक्ष जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत. त्‍यापैकी ‘आप’ने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. भाजप पुढील आठवड्यात उमेदवार जाहीर करणार आहे. तर काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘आरजीपी’च्‍या युतीवर अद्याप शिक्‍कामोर्तब न झाल्‍याने या पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

२५ पर्यंत निवडणूक कार्यक्रम नाही

जिल्हा पंचायत निवडणुकांची नवीन तारीख २० डिसेंबर अशी जाहीर करण्यात आल्याची माहिती महाधिवक्ता देविदास पांगम यांनी न्यायालयात दिली. याचिकाकर्त्यांनी २५ रोजी निकाल होईपर्यंत निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना जारी न करण्याचे प्रतिज्ञापत्र मागितले होते. मात्र, निवडणूक तारीख पुढे ढकलल्याने पुरेसा वेळ मिळाल्याने अधिसूचना जारी होणार नाही, असे पांगम म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT