Youth Congress Dainik Gomantak
गोवा

Youth Congress: स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर महिलांच्या हस्ते झेंडावंदन; युवा कॉंग्रेसची महिला सक्षमीकरण मोहीम

‘शक्ती सुपर शी’ : महिलांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यास प्रोत्साहित करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Youth Congress अखिल भारतीय युवा कॉंग्रेसने महिलांना राजकीय क्षेत्रात आणण्यासाठी, त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी व आत्मनिर्भर करण्यासाठी देशभर ‘शक्ती सुपर शी’ ही मोहीम सुरू केली आहे.

15 ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत महिलांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येईल व गोव्यातही ही मोहीम राबवली जाईल, असे गोवा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद यांनी आज मडगाव येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष केनिशिया मिनेझीस, दक्षिण गोवा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश नदार, मिशेल व अंकिता या पदाधिकारी उपस्थित होत्या.

महिलांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही मोहीम असल्याचे केनिशिया मिनेझीस यांनी सांगितले. ‘शक्ती सुपर शी’ ही मोहीम जुलै २०२३ पासून बंगळुरूमधून सुरू झाली आहे. हा युवा कॉंग्रेसचा मुख्य कार्यक्रम आहे, असे महेश नदार यांनी सांगितले.

महिलांना स्वतःची सुरक्षा, हक्क, स्वातंत्र्य व स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी या मोहिमेद्वारे शिक्षित व जागृत केले जाईल, असेही नदार यांनी सांगितले.

महिलांना शक्ती क्लब सदस्य होण्याची संधी

या मोहिमेंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याचे ध्येय साध्य केले जाईल. तसेच याअंतर्गत दोन कार्यक्रम राबविण्यात आले असून इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून महिलांमध्ये नेतृत्व गुण निर्माण केले जातील. त्याचप्रमाणे शक्ती क्लबची स्थापना केली जाईल.

ज्या महिला कुठल्याही राजकीय पक्षाच्या सदस्य नसतील, त्यांना या शक्ती क्लबच्या सदस्य होण्याची संधी प्राप्त करून दिली जाईल, असे गोवा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT