Goa woman grown Two and a half months fetus in liver
Goa woman grown Two and a half months fetus in liver  
गोवा

गोव्यातली पहिलीच दुर्मिळ घटना; यकृतात वाढला अडीच महिन्यांचा गर्भ

गोमन्तक वृत्तसेवा

बांबोळी : बांबोळीच्या गोवा वैद्यकिय महाविद्यालात एक चमत्कार्क वैदियकिय केस बघावयास मिळाली आहे. यकृतात गर्भ वाढलेल्या एका महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला जीवनदान देण्यात आलं. गोवा वैद्यकिय महाविद्यालय व इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बोदेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या शस्त्रक्रियेची माहिती दिली. 

वाळपईतील २५ वर्षीय महिला उलट्या व पोटाच्या वरच्या भागात दुखत असल्याच्या तक्रारीने गोमॅकोमध्ये (गोवा वैद्यकिय महाविद्यालय व इस्पितळ) दाखल झाली. स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या तज्ञांनी सदर महिलेची तपासणी केल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, या महिलेच्या यकृतीमध्ये आडीच महिन्यांचा गर्भ वाढत होता. गेल्या साठ वर्षातली ही जगातील चाळीसावी घटना असून, देशातली तिसरी व गोव्यातली पहिलीच घटना आहे. 

गोमॅकोतील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सदर महिलेवर अथक परिश्रमाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेने यकृताच्या आत वाढलेला गर्भ यशस्वीपणे हटवण्यात आला. ही शस्त्रक्रिया करताना यकृताला जराही धक्का न पोहोचवता यशस्वीपणे करण्यात आली. या महिलेला दोन मुले आहेत. तसेच, तिचा तीनवेळा गर्भपात झालेलाआहे. ही तिची सहावी गर्भधारणा होती. यापुढे ती पुन्हा आई होऊ शकणार नाही, असे डॉ. बांदेकर यांना सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT