विहीरीत पडलेल्या महीलेला वर काढण्यात आले.यावेळी भयभीत झालेल्या महीलेला धीर देताना महीला पोलीस.

 

Dainik Gomantak

गोवा

Goa: विहिरीच्या कठड्यावर उभी राहून फुले काढण्याच्या प्रयत्नात महिला विहिरीत कोसळली.

मोठा आवाज आल्याने येथील शेजारच्या इमारतीतून एका महिलेने हा प्रकार पाहिला व तीने इतरांना याची माहिती दिली व घटनास्थळी धाव घेतली.

दैनिक गोमन्तक

वास्को: एका विहिरीत शुभांगी गडेकर (59 ) ही महिला फुले (Flowers) काढताना विहिरीचा (well) कठडा कोसळल्याने आत पडली. सदर प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच तिला पोलीस व अग्निशमन दलाच्या सहकार्याने वर काढून जीवदान दिले.

वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी वास्को मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोवा सहकार भांडार समोर एका मोकळ्या जागेत शुभांगी गडेकर ही महिला फुले करण्यासाठी गेली असता तिथे असलेल्या एका विहिरीच्या कठड्यावर उभी राहून फुले काढण्याचा प्रयत्न केला असता, विहिरीचा कठडा तोडून ती महिला विहिरीत कोसळली.

मोठा आवाज आल्याने येथील शेजारच्या इमारतीतून एका महिलेने हा प्रकार पाहिला व तीने इतरांना याची माहिती दिली व घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विहिरीत पडलेल्या महिलेनेही बचावासाठी आरडाओरडा केली. यावेळी तिथे जमलेल्या लोकांनी पोलिसांना तसेच वास्को अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन या महिलेला विहिरीतून बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून सदर महिला सहीसलामत बचावली.

पूर्वी या जागेवर पुष्पांजलि इमारत होती. ती जीर्ण झाल्याने पाडण्यात आली होती. आता या ठिकाणी दाट झाडी निर्माण झाली आहे. या झाडीत सदर विहीर आहे सदर महिला नवेवाडे येथील रहिवासी असून ती पालिकेची सफाई कामगार आहे. शहरात साफसफाईचे काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT