Winter Season Dainik Gomantak
गोवा

Winter Season: गोव्याच्या गुलाबी थंडीत 'या' खास ठिकाणी लूटा नाईट कँपिंगचा आनंद

Winter Season: सुर्ला गावच्या या परिसरात असलेली मोठे मोठी उंच जंगली झाडे आनंद व्दिगुणीत करणारी ठरत आहेत.

दैनिक गोमन्तक

Winter Season: सत्तरी तालुक्यात सर्वाधिक उंच हिल स्टेशन म्हणून सुपरिचित असलेल्या सुर्ला गावात सध्या हिवाळ्यात अतिशय वास्तववादी आल्हादायक अनुभव घेता येत आहे. सुर्ला गावच्या पठारावर रात्रीचे तुंबू घालून अनेकजण एक दिवस सुट्टीचा आनंद अनुभवण्यासाठी येत आहेत. हा नाईट कँपिंगचा आनंद सर्वांनाच आल्हाददायी वाटत आहे. या परिसरात असलेली मोठे मोठी उंच जंगली झाडे आनंद व्दिगुणीत करणारी ठरत आहेत. तसेच या परिसरातील सुर्ला धबधब्याचे विहंगम दृश्य डोंगरमाथ्यावरून न्याहाळता येत आहे.

झाडीतून येणारे पांढरे शुभ्र धुके अशा रम्य सुर्लाच्या परिसरात कर्नाटकातून पाण्याचा प्रवाह गोव्याच्या हद्दीतील खोल दरीत झेपावताना दिसतो. जवळपास तीन - चार कि. मी. वरून याचा आनंद घ्यावा लागतो. काही भागात प्रचंड दरी आणि तसाच कडा आहे. सत्तरी तालुक्याला हे निसर्गसौंदर्याचे देणे आहे. याचा आनंद सध्या पर्यटक लूटत आहेत. चोर्ला घाट काढल्यानंतर कर्नाटक सिमेवर असलेले हे सुर्ला गाव. तेथील विस्तीर्ण असे पठार व देवराई मन प्रसन्न करून सोडते.

डॉ. देविदास कोटकर, निसर्गप्रेमी-

सुर्ला गाव निसर्ग वैभवच आहे. तेथील लोकजीवन जाणून घेऊन परिसरात असलेली जंगलातील सुरेख देखणीय झाडे, रात्रीची, पहाटेवेळी पडणारी शरीराला आनंददायी देणारी थंडी अनुभवावीच. नाईट कँपिंग हे हिवाळ्यात विशेष महत्व लोकांना आहे. समुद्र सपाटीपासून उंचावर असलेले हे सुर्ला गाव हवेहवेसे वाटणारे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT