Vibrant Goa Summit Dainik Gomantak
गोवा

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

CM Pramod Sawant: नवीकरणीय ऊर्जेचा (Renewable Energy) अवलंब करण्याचे गोव्याचे उद्दिष्ट आहे त्यामुळे येत्या काळात गोवा अनेक ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

Akshata Chhatre

Panjim,Goa

पणजी: व्हायब्रंट गोवा 2024 समिटच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लवकरच गोवा पर्यटनव्यतिरिक्त इतर उदयोन्मुख व्यवसायांवर देखील लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती दिली. यामुळे गोव्याला जगाच्या नकाशात स्वतःचे असे अढळ स्थान बनवता येईल असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे होते. अक्षय ऊर्जेचा(Renewable Energy) अवलंब करण्याचे गोव्याचे उद्दिष्ट आहे त्यामुळे येत्या काळात गोवा अनेक ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

हरित उर्जा केंद्र (Green Energy)

गोव्याला एक हरित ऊर्जा केंद्र बनवे तसेच विविध प्रकारच्या उद्योगांसाठी गोवा एक महत्वाचा केंद्रबिंदू बनवा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. वर्ष 2050 पर्यंत गोव्यातील सर्व क्षेत्रांमध्ये केवळ अक्षय ऊर्जेचा वापर केला जाईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेल्या धोरणाला अनुसरून गोवा वाटचाल करत आहे. असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले आहेत.

लक्षणीय प्रगतीचे उद्धिष्ट

व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश प्रभू सांगितले की, ''पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती करण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा देखील उत्तम प्रगती करतोय आणि येणाऱ्या काही काळात इथे विविध व्यवयसाय सुरु केले जाऊ शकतात.

व्हायब्रंट गोवा 2024 समिटमध्ये नवीन तंत्रज्ञान, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काही घटक प्रमुख आकर्षण असतील आणि स्थानिकांना या उपक्रमात अधिकाधिक सामील करुन घेण्याचा प्रयत्न केला गेलाय.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: चांदीची चमक अन् मंगळाची साथ! 'या' राशीसाठी 2026 ठरणार गेम चेंजर; प्रबळ नशिबासाठी करा 'हे' प्रभावी उपाय

Raghav Chadha Resigns: आम आदमी पार्टीत मोठा भूकंप! राघव चड्ढांनी पक्षाला ठोकला रामराम; केजरीवालांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

"मुंबई क्राईम ब्रांचचं नाव वापरुन 61 लाखांची लूट!" मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून करायचा 'डिजिटल अरेस्ट'; अखेर गोवा पोलिसांकडून महाराष्ट्रातील भामट्याला अटक

IPL 2026: गँगवॉरच्या छायेत वाढला, क्रिकेटनं सावरलं, गुन्हेगारीचा अंधार मागं सोडून 'अकिल' बनला आयपीएल सुपरस्टार; मुंबई इंडियन्सविरुद्ध गाजवलं वानखेडेचं मैदान VIDEO

Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

SCROLL FOR NEXT