Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: विधवा आईने पार पाडले मुलीच्या लग्नाचे विधी; आलेमाव म्हणाले यामुळे लढ्याला बळ मिळेल

Yuri Alemao: विधवा भेदभावाविरुद्ध नाईक-डिचोलकर कुटुंबाचे ऐतिहासिक पाऊल

Ganeshprasad Gogate

Yuri Alemao: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मागील काही काळापासून विधवा भेदभावाची प्रथा थांबवण्यासंदर्भात मुद्दा उचलून धरत विधानसभा अधिवेशनात ठराव मांडला होता.

याच विषयाच्या अनुषंगाने आलेमाव यांनी एका लग्न सोहळ्याला ऐतिहासीक क्षण म्हणत एका ट्विट केले आहे. विधवा असलेल्या गोव्यातील उषा नाईक यांनी त्यांची मुलगी गौतमीचे लग्न डॉ. प्रथमेश डिचोलकर यांच्यासोबत लावले आहे. याच मुद्द्यावर आलेमाव यांनी ट्विट करत उषा नाईक यांचे कौतुक केले आहे.

''या अशा पद्धतीच्या लग्न सोहळ्याला पाठिंबा देणाऱ्या नाईक-डिचोलकर कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो. या दोन्ही कुटुंबांनी जो निर्णय घेतला आहे तो राज्य सरकारसाठी नक्कीच प्रेरणादायी असून यामुळे विधवा भेदभावावर बंदी आणणारा कायदा आणण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी मी आशा बाळगतो,'' असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

आलेमाव यांनी याच विषयाच्या अनुषंगाने 31 मार्च 2023 च्या आठव्या गोवा विधानसभेतील "विधवा भेदभावाची अन्यायकारक प्रथा आणि अंत्यसंस्काराच्या वेळी स्त्री-पुरुषांच्या प्रेतांची विकृती" या विषयावरील त्यांच्या खाजगी सदस्य ठरावाचाही संदर्भ ट्विटरवर दिला आहे.

आलेमाव म्हणाले, ''या दोन कुटुंबांनी घेतलेल्या विधवा महिलेला समान वागणूक देण्याच्या पुढाकाराचे मी स्वागत करतो. डॉ. गौतमी या मुलीने उचललेल्या पाऊलाने विधवा भेदभावावर बंदी कायदा आणण्यासाठी सरकारला नक्कीच प्रेरणा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT