Goa Weather Updates Dainik Gomantaak
गोवा

Goa Weather Updates: राज्यात गारठ्यासोबत रविवारपर्यंत धुकेही पडणार

कडाक्याच्या थंडीने भरवली गोवेकरांना हुडहुडी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे (Winter) गोव्यातील ग्रामीण भागात लोक शेकोटी पेटवून बसलेले आढळत असून स्वेटर, गरम कपडे परिधान करीत आहेत. (Goa Weather Updates)

गेल्या काही दिवसांपासून काले, जत्रा तसेच धालोत्सवांना देखील सुरवात झाली असून नागरिकांना या थंडीचा बराच त्रास होत आहे. थंडीमुळे पडणाऱ्या धुक्याचा त्रास रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना होत आहे, तसेच विविध प्रकारचे आजार देखील वाढत आहेत. थंडी, खोकला, पडसे, घसा बसणे, त्वचा फुटणे अशा प्रकारांत वाढ झालेली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या गोव्यातील केंद्राने दिलेल्या माहितीनुसार 16 जानेवारीपर्यंत राज्यातील वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या चोवीस तासांत पणजी येथे कमाल तापमान 29 होते, तर किमान तापमान 17.2 एवढे नोंद झाले आहे.

किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे थंडी वाढली आहे. अनेक भागांत पहाटेच्या वेळी धुक्‍याची दुलई पसरू लागली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या तापमानात घट होणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

डॉक्टरांचा सल्ला राज्यात वाढत असलेल्या थंडीमुळे अनेकजण आजारी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे जरूरीचे आहे. नागरिकांनी शक्यतो उकळून गार केलेले पाणी प्यावे, तेलकट पदार्थ तसेच थंडपेय, आईस्क्रीम आदी पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT