Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोमंतकीयांनो काळजी घ्या! राजधानी पणजी तापली; राज्यात दोन दिवस उष्णतेचा 'यलो अलर्ट'

Rising Temperatures In Goa: राज्यात गेल्या काही दिवसांत उकाडा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वाढत्या उकाड्याने गोमंतकीय हैराण झाले आहेत.

Manish Jadhav

Goa Weather Update Rising Temperatures Yellow Alert Issued

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांत उकाडा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वाढत्या उकाड्याने गोमंतकीय हैराण झाले आहेत. सोमवारी (3 मार्च) राज्यातील तापमान वाढ कायम राहिली. राजधानी पणजी येथे 37 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.

उष्णतेचा यलो अलर्ट

दरम्यान, 3 ते 5 मार्च या कालावधीत राज्यात काही ठिकाणी वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. या तीन दिवसांसाठी हवामान खात्याने 'उष्णतेचा यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची (Health) काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राजधानी पणजी तापली

मागील आठवड्याभरात राजधानी पणजीतील (Panaji) कमाल तापमान पाच दिवस 37 अंशावर गेले होते. गेल्या बुधवारी फेब्रुवारी महिन्यातील पाचव्या दिवशी पणजीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. गोव्यातील सामान्य वातावरण उष्ण आणि दमट असले तरी हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने आणखी चिंता वाढली आहे. सोमवारी सुद्धा राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्रता कायम होती.

राज्यातील तापमान

सोमवारी पणजीत किमान 23.5 अंश तर मुरगावात किमान 23.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसात राज्यातील किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT