Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: सत्तरी, धारबांदोड्याला पाऊस झोडपणार? 'कोसळधार' बरोबर वादळी वाऱ्याची शक्यता

Rain Alert In Goa: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत. यामुळे गोमंतकीय नागरिकांसोबतच शेतकरी, बागायतदार, आणि सामान्य लोक चिंतेत आहेत.

Sameer Amunekar

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत. यामुळे गोमंतकीय नागरिकांसोबतच शेतकरी, बागायतदार, आणि सामान्य लोक चिंतेत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, सत्तरी आणि धारबांदोडा तालुक्यात येत्या तीन तासांत गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामानातील या अस्थिरतेमुळे शेतकरी आणि बागायतदारांची चिंता वाढली आहे, कारण फळबागांवर या पावसाचा मोठा परिणाम होऊ शकतो.

सततच्या वातावरणातील बदलांमुळे गोमंतकीय नागरिक हैराण झाले आहेत. कधी कडक ऊन, तर कधी गडगडाटासह पावसाची हजेरी लागते. या अस्थिर हवामानामुळे सामान्य जनजीवनही प्रभावित होत आहे.

राज्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसाठी या अस्थिर हवामानामुळे धोक्याची घंटा आहे. मार्च ते मे हा कालावधी आंबा आणि काजूच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात बागायतदारांची मेहनत सर्वाधिक असते.

मात्र, सततच्या हवामानातील बदलांमुळे बागांवर पाणी, गडगडाट आणि जोरदार पाऊस यांचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ फेरबदल; हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती, रविंद्र जडेजाच्या बायकोलाही मंत्रीपद

Viral Video: ट्रेनमधून जाणाऱ्या महिलेनं मोठा दगड दुसऱ्या ट्रेनच्या लोको पायलटवर भिरकावला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

IRCTC Down: दिवाळीला गावी जायचं कसं? तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅप अचानक डाऊन; प्रवाशांना मनस्ताप

Rama Kankonkar: एकच सवाल, ‘रामावर हल्ला का झाला?’

ज्युनिअरने लास्ट ईअरच्या विद्यार्थीनींवर कॉलेजच्या बाथरुममध्ये केला लैंगिक अत्याचार; अत्याचारानंतर म्हणाला, 'गोळी हवी का'?

SCROLL FOR NEXT