Goa weather update Dainik Gomantak
गोवा

Goa weather update: गोव्यात उन्हाचा तडाखा; उकाड्यानं नागरिक त्रस्त, पारा ** अंशांवर

Goa heatwave news: राज्यात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. आता तर कोठे मार्च महिना सुरू झाला आहे, परंतु उन्हाळ्याच्या सुरवातीलाच उकाड्याने गोमंतकीय हैराण झाले आहेत.

दुपारच्‍या वेळी तर घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे. पूर्व आणि ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा जोर मंदावल्याने उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे गोवा वेधशाळेने म्हटले आहे.

त्यामुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. पुढील दोन दिवस राज्यात उष्म्याचा यलो अलर्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्म्यापासून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवारी राज्यात कमाल तब्बल ३५.२ तर किमान २२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात सामान्य तापमानाच्या तुलनेत तब्बल ५ अंशांनी वाढ झाली आहे.

राज्यात आर्द्रता ही वाढलेली आहे. पुढील दोन दिवस राज्यात उष्म्याच्या यलो अलर्ट जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT