Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Monsoon 2024: वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट देखील होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलीय.

Pramod Yadav

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने दडी मारल्यानंतर राज्यात उष्णतेचा पार देखील वाढू लागला आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात राज्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली असून, दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सोमवार (२३) आणि मंगळवार (२४ सप्टेंबर) या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या काळात राज्यात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट देखील होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलीय.

कोकणातही पावसाची शक्यता

कोकणात देखील पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाने उघडीप दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT