Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update : मुसळधार काणकोणातील पिकांवर वरुणराजाचा कोप

Goa Weather Update : सर्वात जास्त नुकसानी गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील भूपर,तुडल व खोतीगाव पंचायत क्षेत्रात तसेच आगोंद पंचायत क्षेत्रातील शेतीची हानी झाली आहे, असे विभागीय कृषी अधिकारी सर्वणकर यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण,काणकोणात शेतीची लागवडीच्या काळात गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने भातशेतीची कामे अर्धवटच आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रोपे वाहून गेली.

आतापर्यत काणकोणात सुमारे ६० टक्के शेतीची लागवड पूर्ण झाली आहे.सध्या पाऊस ओसरल्याने भातशेती व बागायतीच्या नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे दोन दिवसांत नुकसानीचा अहवाल देण्यात येणार असल्याचे विभागीय सहाय्यक कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी सांगितले.

सर्वात जास्त नुकसानी गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील भूपर,तुडल व खोतीगाव पंचायत क्षेत्रात तसेच आगोंद पंचायत क्षेत्रातील शेतीची हानी झाली आहे, असे विभागीय कृषी अधिकारी सर्वणकर यांनी सांगितले.

गावडोंगरी व खोतीगावातील शेती वाहून गेली आहे, तसेच लागवडीसाठी तयार तरवाही वाहून गेला आहे. काणकोणातील बहुतेक शेतकरी ज्योती, कर्जत, जया या भात बियाणांना पसंती देतात.

गोवा धन -३, रत्नागिरी -६ या भात बियाणांची पेरणी शेतकऱ्यांकडून केली जाते.अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना रासायनिक खतावर अनुदान दिले जाते. मात्र कृषी खाते सध्या जैव खताला प्राधान्य देत आहे. शेतकरी शेणखताचा वापर करून भात पीक घेत आहेत, असे जानू गावकर व कृष्णा गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT