Goa Weather Rain Update Dainik Gomantak
गोवा

अखेर मॉन्सून गोव्यात दाखल

Goa Weather : दहा दिवसांनंतर सक्रिय ; पणजीसह राज्यभरात जोरदार सरी

दैनिक गोमन्तक

Goa Weather : मॉन्सूनच्या आगमनाबाबत देशभर तर्कवितर्क सुरू होते, हवामान विषयक माहिती देणाऱ्या खासगी संस्थांनी भारतीय हवामान खात्याच्या मॉन्सूनच्या आगमनविषयी आक्षेप नोंदवला होता. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून ज्या मॉन्सूनची प्रतीक्षा होती,तो अखेर आज राज्यात दाखल झाला आहे.,अशी माहिती अधिकृतरित्या गोवा वेधशाळेने दिली आहे.

बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बरोबर केरळमध्ये काही दिवस अगोदर दाखल झालेला मॉन्सून राज्याच्या वेशीवर तब्बल दहा दिवस रेंगाळला होता. यावरून हवामानविषयक जगभरातील तज्ज्ञांनी भारतीय हवामान खात्याला लक्ष्य केले होते. अखेर नैऋत्य मौसमी वाऱ्याचा वाढलेला वेग तसेच समुद्रावरून येणारी आर्द्रता याचा मिलाफ होऊन हवामान खात्याने मॉन्सून पुढे सरकल्याचे जाहीर करून संपूर्ण गोवा मॉन्सूनने व्यापल्याचे स्पष्ट केले आहे.

वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल म्हणाले,मॉन्सूनसाठीची पोषक स्थिती निर्माण होण्याबरोबरच मॉन्सूनसाठीचे निकष पूर्ण झाल्याने हवामान खात्याने मॉन्सून पुढे सरकल्याचे जाहीर केले आहे. राज्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी पडत असून काल संध्याकाळपासून मॉन्सूनचे ढग जमत असल्याचे दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT