Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: राज्यात गारठा वाढला; पुढील काही दिवस किमान तापमान 19 अंशापर्यंत राहणार

Goa Weather : सांगे, सत्तरी, काणकोण, धारबांदोडा, पेडणे आदी तालुक्यातील ग्रामीण भागात संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात थंडी पडते.

Ganeshprasad Gogate

Goa Weather : राज्यात आता चांगलाच गारठा वाढू लागला आहे. देशात काही भागात तापमानाचा पारा घसरू लागला आहे.

राज्यात जानेवारी महिन्याच्या मध्यापासून राज्यात खऱ्या अर्थाने थंडीला सुरूवात झाली. मागील काही दोन आठवड्यांपासून राज्यातील किमान तापमान 19 ते 20 अंश सेल्सिअस आहे.

पुढील चार-पाच दिवस राज्यातील किमान तापमान 19 अंशापर्यंत राहणार असून हवामान कोरडे राहील. राज्यातील काही भागात पहाटे धुके व मंज पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

पणजी येथे कमाल 30.5 अंश सेल्सिअस, तर किमान 19.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात थंडीचा प्रभाव हा ग्रामीण भागात, पाणथळ जागेच्या ठिकाणी तसेच घटलगतच्या भागात मोठ्या प्रमाणात जाणवतो.

सांगे, सत्तरी, काणकोण, धारबांदोडा, पेडणे आदी तालुक्यातील ग्रामीण भागात संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात थंडी पडते. त्यामुळे उबदार कपडे आणि शेकोटी पटवून नागरिक थंडीपासून बचाव करतात.

राज्यात सध्या धालो आणि जत्रोत्सव सुरू असल्याने जत्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात उबदार टोपी, जॅकेट, ग्लावस खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

केवळ उत्तर भारतातच नाही तर अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे, अनेक राज्यांमध्ये दाट धुक्यामुळे ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.

इतकेच नाही तर दिल्ली एनसीआर, हरियाणा, पंजाब सारख्या ठिकाणी सूर्यप्रकाश असेल पण थंड वाऱ्यामुळे लोक त्रस्त राहू शकतात.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत बिहारच्या बहुतांश ठिकाणी सकाळी आणि रात्री दाट धुके पडेल. पुढील चार-पाच दिवस आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT