Goa Monsoon | Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: ..बास बाबा आता! 6 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी; मध्‍यम स्वरूपाचा पाऊस पडणार

Goa Rain Alert: पेडणे, जुने गोवे, साखळी, वाळपई, फोंडा, काणकोण आणि केपे या केंद्रांवरही इंचाचे शतक पूर्ण करीत पावसाने दीडशतकाच्‍या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यात सातत्‍याने कोसळत असलेल्‍या पावसाने धारबांदोडा आणि सांगे या दोन केंद्रांवर इंचाचे दीडशतक पूर्ण केले आहे. तर, पेडणे, जुने गोवे, साखळी, वाळपई, फोंडा, काणकोण आणि केपे या केंद्रांवरही इंचाचे शतक पूर्ण करीत पावसाने दीडशतकाच्‍या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

पुढील सहा दिवस राज्‍यात मध्‍यम स्वरूपाचा पाऊस कायम राहील असा अंदाज वर्तवत राज्‍य हवामान विभागाने यलो अलर्टही जारी केला आहे. मान्‍सूनचा पाऊस यंदा राज्‍यात अंदाजाच्‍या सुमारे बारा दिवस आधीच दाखल झाला. त्‍यानंतर पुढील काही दिवस हजेरी लावल्‍यानंतर मध्‍यंतरीच्‍या काळात त्‍याने बराचवेळ विश्रांती घेतली होती.

गणेश चतुर्थीच्‍या काही दिवस आधी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्‍याने मान्‍सूनला पोषक वातावरण मिळाले. त्‍यामुळे चतुर्थीच्‍या आधीपासूनच पावसाने राज्‍यभर हजेरी लावली. गेल्‍या चार–पाच दिवसांत राज्‍यातील सर्वच भागांमध्‍ये मुसळधार पाऊस पडला. त्‍यामुळे धारबांदोडा आणि सांगे या केंद्रावरील पावसाच्‍या इंचाचे दीडशतक पार झाले.

तर, शतकी खेळी केल्‍यानंतर पेडणे, जुने गोवे, साखळी, वाळपई, फोंडा, काणकोण आणि केपे या केंद्रांवर दीडशतकाच्‍या दिशेने पावसाची वाटचाल सुरू आहे. यंदाच्‍या मान्‍सून हंगामात १ जून ते ३१ ऑगस्‍टच्‍या सकाळी ८.३० पर्यंत राज्‍यात एकूण ११३.३२ इंच पावसाची नोंद झाली. या काळात राज्‍यात सरासरी १०५.८७ इंच इतका पाऊस पडतो.

कोठे किती पाऊस पडला? (इंचात)

केंद्र पाऊस

म्‍हापसा ९६

पेडणे १०९.२९

पणजी ९३.२९

जुने गोवे १०७.०५

साखळी ११६.४०

वाळपई १४३.६७

फोंडा १२१.३१

धारबांदोडा १५० पेक्षा अधिक

काणकोण १०७.८२

दाबोळी ७८.९६

मडगाव ९५.४२

मुरगाव ७८.०५

केपे १३९.१५

सांगे १५० पेक्षा अधिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT