Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: अवकाळी पावसानंतर उकाडा आणखी वाढला; नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत असतानाच बाजारात नागरिकांची वर्दळ

Valpoi Weekly Market: गेल्या काही दिवसांपासून राज्‍यात उकाडा प्रचंड वाढला आहे. त्‍यामुळे दैनंदिन कामकाज करणेही कठीण बनले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: गेल्या काही दिवसांपासून राज्‍यात उकाडा प्रचंड वाढला आहे. त्‍यामुळे दैनंदिन कामकाज करणेही कठीण बनले आहे. तरीसुद्धा आठवडा बाजारांमध्‍ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.अवकाळी पावसाच्या सरींनंतर काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र पावसानंतर वातावरणातील उकाडा आणखी वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले असून, या उष्णतेपासून कधी दिलासा मिळणार याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत.मंगळवारी वाळपईचा आठवडा बाजार नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. बाजारात विविध प्रकारच्या भाज्या, फळे आणि जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

आंब्यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, ते दहा ते पंधरा रुपयांच्या दराने विकले जात असल्याचे चित्र दिसून आले.प्रखर उन्हाची झळ सोसत नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी केली. उष्णतेचा पारा वाढला असतानाही बाजारातील वर्दळ कायम राहिल्याने नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि खरेदीची लगबग स्पष्टपणे जाणवत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT