Goa Rain  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी! ऐन चतुर्थीत पावसाचा धुमाकूळ; डिचोली, सत्तरी, सांगे भागांतील नद्यांना पूर

Goa Weather: बुधवार आणि गुरुवारच्‍या अठ्ठेचाळीस तासांत राज्‍यात सुमारे दहा इंच पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे डिचोली, सत्तरी, सांगे आदी भागांतील काही नद्यांना पूर आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोमंतकीयांचा सर्वांत मोठा सण असलेल्‍या गणेशोत्‍सवास बुधवारपासून प्रारंभ होताच, राज्‍यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राज्‍य हवामान विभागाने शुक्रवारीही ‘यलो अलर्ट’ जारी केल्यामुळे जोरदार ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस पडण्‍याची शक्‍यता आहे.

बुधवार आणि गुरुवारच्‍या अठ्ठेचाळीस तासांत राज्‍यात सुमारे दहा इंच पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे डिचोली, सत्तरी, सांगे आदी भागांतील काही नद्यांना पूर आहे.

काही भागांत रस्‍त्‍यांवर पाणी साचून ते स्‍थानिकांच्‍या घरांमध्‍ये शिरले. तर, हरमलमध्‍ये माड कोसळून एका घराची हानी झाली.

साखळीत पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गुरुवारी संध्याकाळपर्यंत पूर ओसरला. पंपिंग करून येथील पाण्याचा निचरा करण्यात आला.

यंदा राज्‍यात मान्‍सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्‍यानंतर अंदाजाआधी सुमारे बारा दिवस आधीच मान्‍सूनचा पाऊस राज्‍यात दाखल झाला. नंतरचे काही दिवस पावसाने संपूर्ण राज्‍याला व्‍यापले.

आठ केंद्रांवर इंचांचे शतक

१ जून ते २८ ऑगस्‍टच्‍या सकाळी ८.३० पर्यंत राज्‍यात १०९.२२ इंच पावसाची नोंद झाली असून, चौदापैकी आठ केंद्रांवर इंचांचे शतकही पूर्ण केले आहे. आतापर्यंत सर्वाधिक १४३.६२ इंच पाऊस सांगे येथे झाला असून, सर्वांत कमी ७३.५३ इंच पाऊस मुरगावात झाला आहे.

गतवर्षीपेक्षा ४०.८५ इंच कमी पाऊस

यंदाच्‍या मान्‍सून हंगामात आतापर्यंत पडलेला १०९.२२ इंच पाऊस सरासरीच्‍या ५.४ टक्‍के इतका अधिक आहे. परंतु, हा पाऊस गतवर्षी पडलेल्‍या पावसापेक्षा ४०.८५ इंचांनी कमी आहे. गेल्‍या वर्षी याच काळात राज्‍यात १५०.०७ इंच पावसाची नोंद झाली होती.

‘अग्निशमन’कडे ५३ कॉल्सची नोंद

अग्निशमन दलाच्या पणजीतील मुख्यालयात दोन दिवसांत (बुधवार आणि गुरुवार) मिळून एकूण ५३ कॉल आले होते. त्यात सर्वाधिक ४५ कॉल हे ठिकठिकाणी झाडे पडल्याचे होते. तर इतर कॉल हे अत्यावश्यक मदतीसाठी होते, अशी माहिती नियंत्रण कक्षातून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT