Water Shortage Dainik Gomantak
गोवा

Goa Water Shortage: माजोर्डा-शापोरा पाणीपुरवठा समस्येवर मावनाधिकार आयोगाने घेतली दखल; अभियंत्यांना दिले 'हे' निर्देश

Goa Water Shortage: अनेक वर्षांपासून शापोरातील बादे, बंदिरवाडामध्ये पाण्याची समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Water Shortage: माजोर्डा, शापोरा, आसगाव, हणजूण या भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील रहिवाशांनी काढलेल्या मोर्चाची स्वेच्छा दखल गोवा मावनाधिकार आयोगाने घेतली आहे.

आयोगाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांना नोटीस बजावून येत्या 11 मार्च 2024 पर्यंत उत्तर देण्याचे व त्या दिवशी व्यक्तिशः उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

शापोरामध्ये मागील महिन्याभरापासून पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने त्रस्त नागरिकांनी मंगळवारी म्हापसा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागावर घागर मोर्चा काढत अधिकार्‍यांना जाब विचारला होता.

यावेळी सहाय्यक अभियंत्यांनी येत्या काही दिवसांत हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले होते. या मोर्चाची स्वेच्छा दखल गोवा मावनाधिकार आयोगाने घेतली आहे.

आयोगाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांना नोटीस बजावून येत्या 11 मार्च 2024 पर्यंत उत्तर देण्याचे व त्या दिवशी व्यक्तिशः उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अनेक वर्षांपासून शापोरातील बादे, बंदिरवाडामध्ये पाण्याची समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. दरवेळी लोक कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन येताच पाणीपुरवठा काही दिवासांसाठी सुरळीत होतो.

त्यानंतर, पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. विशेष म्हणजे पिण्यासाठी म्हणून या गावांमध्ये जो पाणी पुरवठा होतो तो दररोज पहाटे काही तासच असतो. त्यामुळे सध्या येथील कुटुंबांना पाणी विकत आणावे लागत असल्याचे स्थानिकांनी मोर्चावेळी सांगितले.

गेल्या महिन्याभरापासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने लोकांची मोठी पंचाईत होत असून वर्षानुवर्षे ही समस्या असूनही सार्वजनिक बांधकाम खाते काहीच उपाययोजना हाती घेत नाही, असा आरोपही ग्रामस्थांनी केला.

तसेच, पाणीपुरवठा विभागाचे पर्यवेक्षक व ऑपरेटर पाणी अन्यत्र वळवतात. त्यामुळे आम्हाला पाणी मिळत नसल्याचे आरोपही काही मोर्चेकर्‍यांनी केला होता.

त्याचप्रमाणे, पाणीपुरवठा टँकर वेळेत उपलब्ध होत नसल्याची खंत मोर्चेकरांनी बोलून दाखविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT