Water Treatment Plant Dainik Gomantak
गोवा

Water Treatment Plant: सरकारी प्रकल्पांना सहकार्य करा, सुर्ल प्रकल्पाबाबत घडलेला 'तो' प्रकार दुःखदायक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत: गांजे येथ जलप्रक्रिया प्रकल्पाचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Water Treatment Plant सरकार आणि मुख्यमंत्री काही तरी करीत असल्याने त्याला विरोध करणे आणि त्याचे विपरीत परिणाम संपूर्ण गावाला व गावातील लोकांना भोगण्यास सोडावे ही वृत्ती समाजासाठी घातक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गांजे - पाळी येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे जिल्हा मिनरल फाउंडेशनच्या साहाय्याने साकारलेल्या जलप्रक्रिया प्रकल्पाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता संतोष म्हापणे, मिनरल फाउंडेशनच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी मामू हागे, पाळीचे सरपंच शिवा मुळगावकर, वेळगेच्या सरपंच सामंता कामत, सुर्लच्या सरपंच विश्रांती सुर्लकर, कनिष्ठ अभियंता आगा उपस्थित होते.

सुर्ल प्रकल्पाची नासधूस दुःखदायक

सुर्ल गावातील शेतकऱ्यांना व बागायतींना मोफत पाणी मिळावे यासाठी या भागातील खाण खंदकातून पाणी पंपिंग करून ते वाहिनीद्वारे पारंपरिक पाटात सोडण्याची योजना सुमारे 4 कोटी रुपये खर्चून हाती घेतली होती.

पण लोकांना पाणी मिळणार या गोष्टीमुळे दुःखी झालेल्या काही राजकीयदृष्ट्या प्रेरित लोकांनी जलवाहिनीच जाळून टाकली. या घटनेचे बरेच दुःख झाले, असे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT