Goa Water Metro Dainik Gomantak
गोवा

Goa Water Metro: गोव्यात 'जल मेट्रो' येणार, पण लगेच नाही! मंत्री कामतांचं मोठं वक्तव्य; आराखडा तयार करण्यात येणार

Digambar Kamat Water Metro: सरकारने गोव्यात ‘जल मेट्रो’चा प्रस्ताव पुढे केला असला तरी तो इतक्या लवकर होणार नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: सरकारने गोव्यात ‘जल मेट्रो’चा प्रस्ताव पुढे केला असला तरी तो इतक्या लवकर होणार नाही. सरकारतर्फे सर्वप्रथम याचा संपूर्ण अहवाल, आराखडा तयार केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.

ते म्हणाले, कोची येथे आपण जल मेट्रो पाहण्यासाठी गेलो होतो. त्या जल मेट्रोचा व्यवस्थापकीय संचालक माझा मित्र असल्याने त्याने निमंत्रण दिले होते. तिथे जाऊन जल मेट्रोची पाहणी केली. तिथे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने जल मेट्रो चालवली जाते. तिथे वातानुकूलित बोटीसुद्धा वापरल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

वेंडर्स समितीची आठ दिवसांत नियुक्ती केली जाणार आहे. आजच्या बैठकीत अनेकांनी व्यापारी परवाना हस्तांतरण प्रश्न आपल्यासमोर मांडले. त्यातील काही प्रश्न गुंतागुंतीचे आहेत, पण साधी प्रकरणे सोडवण्यात आली आहेत, असे कामत यांनी स्पष्ट केले.

स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य

कामत यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत काहींनी नगरपालिकेतील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर नियमित स्वच्छता देखरेखीसाठी एका अभियंत्याला हे काम द्यावे तसेच घरपट्टी किंवा व्यापारी कर भरण्यासाठीच्या काऊंटरसमोर तसेच जन्म व मरण दाखले घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ज्या खुर्च्या ठेवल्या आहेत, त्या बदलण्याच्या सूचनाही केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

SCROLL FOR NEXT