Goa Water Conservation Dainik Gomantak
गोवा

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Goa Water Shortage 2026: राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही मे महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे, पाण्यासंदर्भात घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी/मडगाव: राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही मे महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे, पाण्यासंदर्भात घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही. पाण्याचे योग्य नियोजन जलस्रोत व पेयजल खात्यांकडून केले जात आहे. मात्र, जनतेने पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे, असे मत पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

मडगावातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फळदेसाई बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील जलसाठ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे; पण योग्य नियोजन केल्यास पुढील वर्षी मे आणि जून महिन्यापर्यंत तो साठा पुरू शकतो. येत्या महिनाभरात पावसाचे प्रमाण कसे राहते याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. साळावली धरणाचा ओव्हरफ्लो अजूनही सुरू आहे, ही महत्त्वाची बाब आहे. हा ओव्हरफ्लो नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल्यास दक्षिण गोव्यातील पाणीपुरवठा सुरळीत असेल.

आवश्यक नियमावली जारी करू!

खाणीच्या खंदकातील पाणी शुद्ध करून ते पुन्हा उपयोगात आणण्याचा विचार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांत राज्यात पाण्याची टंचाई भासली नाही. गरजेनुसार सरकारकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल आणि वेळोवेळी आवश्यक नियमावली जारी केली जाईल; परंतु पाण्याची उपलब्धता आणि परिस्थितीचा सतत आढावा घेतला जात आहे. गरजेनुसार जनतेसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या जातील. स्थानिक जलस्रोताचा वापर करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे फळदेसाई यांनी नमूद केले.

लोकसेवेसाठी राजकारणात!

आगामी विधानसभा निवडणुकीवर सुभाष फळदेसाई म्हणाले की, मी केवळ आमदार होण्यासाठी काम करीत नाही. सांगे मतदारसंघ आरक्षित झाल्यास पक्षाच्या सूचनेनुसार आपण काम करू. पक्ष सांगेल त्या ठिकाणाहून आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत; कारण आपण केवळ आमदार होण्यासाठी नाही तर लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आहोत आणि १९९६ पासून आपण भाजपसोबत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; चीनी बॉक्सिंगपटूला दिली मात

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT