Churchill Alemao Latest News
Churchill Alemao Latest News Dainik Gomantak
गोवा

चर्चिल आलेमाव यांचे पुन्हा दिसले पोर्तुगीज प्रेम, म्हणाले 'त्यांच्यामुळेच गोव्याचा 80 टक्के विकास'

Pramod Yadav

Churchill Alemao: चर्चिल आलेमाव यांनी गोवा मुक्तिदिनी पोर्तुगीजांचे गुणगान गायले होते. मी पोर्तुगीजांना सलाम करतो, असे आलेमाव म्हणाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आलेमाव यांचे पोर्तुगीज प्रेम दिसले असून, गोमन्तकीयांना दोन पासपोर्ट का असावेत याचे उत्तर दिले आहे.

पोर्तुगीजांनी जाताना 1962 पूर्वी जन्मलेल्या गोमन्तकीयांना पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्याची दारे खुली केली. यामुळे सासष्टी तालुक्यातील गरिबी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असा अजब दावा आलेमाव यांनी 19 डिसेंबर रोजी केला होता.

आत्ता काय म्हणाले आलेमाव?

"मी पोर्तुगीजांना सलाम करतो. त्यांच्यामुळे गोव्याचा 80 टक्के विकास झाला. त्यांच्यामुळेच गोमन्तकीयांना परदेशात नोकरी करता आली. लोक पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन कामाला जातात आणि मतदानासाठी भारतात परत येतात. त्यामुळे गोमन्तकीयांना दोन्ही पासपोर्ट ठेवण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे," असे आलेमाव म्हणाले.

दरम्यान, सध्या नव्याने मंत्री झालेले आलेक्स सिक्वेरा यांच्या पासपोर्टचा मुद्दा गाजत आहे. सिक्वेरा यांचा देखील पासपोर्ट पोर्तुगीज असून, त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी माजी आमदार मिकी पाशेको यांनी लावून धरली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT