Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: गोव्यातील कष्टकऱ्यांचे पोट मारून गुजरातच्या कंपनीला कंत्राट का?

पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न मांडणार- विजय सरदेसाई

गोमन्तक डिजिटल टीम

Mid Day Meal गोव्यातील शाळांना माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या गोव्यातील स्वयंसेवा गटांना डावलून सरकार गुजरात येथील एका कंपनीला या कामाचे कंत्राट देऊ पहात आहे.

मात्र गोवा फॉरवर्ड पक्ष हे होऊ देणार नाही. या विरोधात आम्ही पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

आज स्वयंसेवा गटाच्या सदस्यांनी ‘गोंयकार घरात’ सरदेसाई यांची भेट घेतली. सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. या अन्यायांविरोधात आवाज काढा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मी आताच जास्त काही बोलत नाही. मात्र या गोव्यातील गटांचे पोट मारून गुजरातच्या कंपनीला गोव्यात कोण, आणू पाहात आहे. त्यात कोण भागीदार आहेत. त्याचा फायदा कोणाला होणार? या सगळ्यांचा भांडाफोड मी विधानसभेत करेन, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सरकार गोव्यातील गटांशी फक्त एक वर्षाचा करार करतो आणि गुजरातच्या कंपनीकडे 15 वर्षांचा कंत्राट करत आहे.

या गटाकडून मिळणारे जेवण योग्य प्रकारचे नाही, असे सांगून हे काम गुजरातच्या कंपनीकडे देण्यात येत आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Women Cricket: महिला संघाचा डाव घसरला; 96 धावांत सात खेळाडू बाद; पहिल्या डावात 285 धावा

Wimbledon Tennis: ॲलेक्झँडर झ्वेरेव अंतिम फेरीत; विंबल्डन टेनिस, आर्थर फेरीवर तीन सेटमध्ये मात

Goa U19 Cricket: गोव्याच्या फिरकी गोलंदाजांचा प्रभावी मारा; केरळला 302 धावांत रोखले; आफ्रिदचे 4, ओमचे 3 बळी

Goa Football Association: फुटबॉलपटूंच्या कल्याणासाठी 'GFA' कटिबद्ध; लवकरच खेळाडू संघटना स्थापनेसाठी प्रयत्न- कायतान फर्नांडिस

BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये! सलग पराभवानंतर इमर्जन्सी बैठक; रोहित-कोहलीचं कमबॅक, श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी आणि गंभीरच्या भूमिकेवर होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT