Mormugoa Taluka Implementation Squad (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वास्कोतील विक्रेत्यांना भरावा लागला दंड

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 चे कलम 4 चे उल्लंघन (Goa)

Dainik Gomantak

Goa: सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा 2003 चे कलम 4 चे उल्लंघन (Violation of Rule 4 of the Act 2003) केल्याप्रकरणी मुरगाव तालुका अंमलबजावणी पथकाने (Mormugoa Taluka Implementation Squad) शुक्रवारी काही विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करून 2200 रुपयांचा दंड (Penalty) वसूल केला. मुरगावचे मामलेदार धीरेन बाणावलीकर, गोवा कॅनचे समन्वयक रोलँड मार्टिन्स यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी सकाळी वास्को बसस्थानक (Vasco Bus stand) आणि फुलांच्या बाजारपेठेत (Flower Market) तपासणी केली.

कायदा 2003 च्या नियम चारचं उल्लंघन

या पथकामध्ये मामलेदार कार्यालयाचे सर्कल निरीक्षक विठू खरात, ज्युनियर स्टेनो महादेव फडते, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांचा समावेश होता. तपासणी करताना काही विक्रेत्यांनी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 च्या नियम 4 चे उल्लंघन केल्याचं आढळून आलं. ज्यांना अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाकडून परवाने देण्यात आले होते ते योग्यरीत्या प्रदर्शित करण्यात आले नसल्याचं आढळून आलं.

काही आस्थापनांमध्ये सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ (Cigarettes and Tobacco Products) कायाद्यातील तरतुदींप्रमाणे आवश्यकतेनुसार धूम्रपान प्रतिबंध चिन्ह योग्यरीत्या प्रदर्शित केले गेले नव्हते. या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पुढील त्रैमासिक आढावा बैठकीत याबद्दल अहवाल देण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

Viral Video: बघता-बघता फिटनेस सेंटर बनले 'आखाडा'; जिममध्ये तरुणांची तुंबळ हाणामारी, रॉडने हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT