Kutban fish jetty in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Elections: वेळ्ळी मतदारसंघाला हवा मास्टरप्लॅन

कुटबण जेटीला समस्‍यांची दुर्गंधी. असोळण्‍याचा मासळी बाजारप्रकल्‍प शीतपेटीत

Mahesh Tandel

कुंकळ्ळी : वेळ्ळी मतदारसंघात अनेक समस्या आहेत. बेरोजगारीने येथील युवावर्ग त्रासला आहे. मतदारसंघातील बहुसंख्य लोक जहाजावर (Boat) व आखातात काम करतात. येथील जनतेचा प्रमुख उद्योग मच्छीमारी (Fisheries). मात्र, काही पंचायत क्षेत्रातील मतदार आजही मजुरी करून पोट भरत आहेत. सां जुझे दि आरियाल पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर भंगार (Illegal scrap spots) अड्डे लोकांची पाठ सोडत नाहीत.

चिंचोणेकरांना बहुउद्देशीय प्रकल्प हवा आहे. असोळण्याचा शीतपेटीत पडलेला मासळी बाजार (Fish Market) प्रकल्प, वेळ्ळी पंचायत क्षेत्रातील कुटबण जेटीवरील समस्या, असे अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. महत्त्वाचे म्हणजे साळ नदीवर (Sal River) झालेले अतिक्रमण व नदीच्या प्रदूषणाची (Pollution) समस्या अजूनही सुटत नाही. या मतदारसंघाचा विकास साधायचा असेल, तर नियोजनबद्ध विकास आराखडा (मास्टर प्लॅन) (Master Plan) तयार करून त्याची अंमलबजावणी करावी लागेल.

ख्रिस्‍ती मतदारांचे प्राबल्‍य
वेळ्ळी मतदारसंघ हा सासष्टीतील प्रमुख मतदारसंघ असून ख्रिस्ती मतदारांचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तीनवेळा अपक्ष उमेदवार सोडल्यास या मतदारसंघावर प्रत्येक वेळी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून आलेला आहे. विद्यमान आमदार व जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी या मतदारसंघाचे चारवेळा प्रतिनिधित्व केले आहे. हा मतदारसंघ पूर्वी कुंकळ्‍ळी मतदारसंघाचा भाग होता. १९८९ साली कुंकळ्ळीपासून विभागणी करून वेळ्ळी मतदारसंघ तयार करण्यात आला. फेरल फुर्तादो या मतदारसंघाच्या पहिल्या आमदार बनल्या. मानू फर्नांडिस, फिलीप नेरी व बेंजामीन सिल्वा यांनी अपक्ष म्हणून येथे निवडणूक जिंकली आहे.

अपेक्षित विकास झालाच नाही?
या मतदारसंघावर मच्छीमार समाजाचा प्रभाव आहे. कुटबण जेटी ते दिकारपालीपर्यंत भौगोलिक दृष्टीने विखुरलेल्या या मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालाच नाही. काही भाग तर आजही मागासलेला आहे. मडगाव शहराला लागून असलेल्या दिकारपाली पंचायतीचे दोन प्रभाग या मतदारसंघात दुर्लक्षित राहिले आहेत.

लोकप्रतिनिधींचे अपयश
मतदारसंघातील असोळणा पंचायत क्षेत्रातील मासळी बाजार दक्षिण गोव्यात प्रसिद्ध आहे. मासळी खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करतात. तिथे दुर्दशा झालेली आहे. थोर स्वातंत्र्यवीर डॉ. ज्युलियांव मिनेझिस व डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या स्‍मरणार्थ उभारलेल्या चौकाची पार दुर्दशा झाली आहे. दक्षिण गोव्यातील प्रमुख मच्छीमार बंदर असलेली कुटबण जेटी वादात सापडली असून या जेटीची समस्या सोडविण्यास सर्व आमदारांना अपयश आले आहे. सासष्टीची जीवनदायिनी असलेली साळ नदी असोळणा येथे दम तोडीत आहे. यावर उपाय काढण्याचे धाडस दाखविणारा आमदार जनतेने पाहिलेला नाही.

जाहीरनामा राहिला कागदावरच
मतदारसंघात अनेक फुटबॉल मैदाने उभारलेली आहेत. मात्र, त्यांची देखभाल व वापर होतो की नाही, हे पाहणारी यंत्रणाच नाही. मतदारांना विश्वासू व मतदारसंघाचा विकास साधणारा प्रामाणिक आमदार हवा आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले व नंतर भाजपमध्ये गेलेले फिलीप नेरी यांनी आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र, हा जाहीरनामा कागदावरच राहिला, असे मतदार सांगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT