Cylinder |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Vasco News: एजन्सी कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद झाला ; सांकवाळमध्ये कमी वजनाचे सिलिंडर

Vasco News: वजन आणि मापे विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून कायदेशीर तक्रार

दैनिक गोमन्तक

Vasco News: सांकवाळ येथे घरांमध्ये वितरित केलेले अनेक एलपीजी गॅस सिलिंडर निर्धारित वजनापेक्षा कमी वजनाचे असल्याचे आढळून आल्याने सांकवाळ गावात एकच खळबळ माजली. एलपीजी एजन्सी कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद झाला. स्थानिकांनी वजन आणि मापे विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून कायदेशीर तक्रार केली. मात्र, टेम्पोचा चालक व 2 कर्मचारी वाहन सोडून पळून गेले.

गॅस सिलिंडरची गाडी सांकवाळ येथे दाखल झाल्यानंतर ग्राहकांनी गॅस सिलिंडर घेतले. मात्र, थोड्या वेळातच काही नागरिकांना सिलिंडरच्या वजनात तफावत असल्याचे जाणवले. त्यांनी याबद्दल गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली.

पण गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे नागरिक आणि एजन्सी कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादानंतर थोड्या वेळातच चालक आणि कर्मचारी वाहन सोडून पळून गेले. त्यांच्या पळून जाण्याने ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

केंद्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय

घरगुती गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजाराला आळा घालणे सोपे होणार आहे. त्यासाठी लवकरच घरगुती गॅस सिलिंडरवर ‘क्यूआर कोड’ लावण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकतीच दिली आहे. याची अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT