Shri Damodar Saptah Utsav  Dainik Gomantak
गोवा

Vasco News: वास्कोत दामबाबाचा जयघोष, मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर 'श्रींचरणी' नतमस्तक

भजनी सप्ताहाला प्रारंभ ः पहाटेपर्यंत रंगल्या पार समित्यांच्या गायन मैफली

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News: वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सवाला आज मंगळवारी (ता. २२) रोजी दुपारी १२.३० वाजता उद्योजक प्रशांत जोशी यांनी श्री दामोदर देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर ‘जय जय राम कृष्ण हरी’ नामाच्या गजरात अतिशय भक्तिमय वातावरणात व उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी जोशी कुटुंबीयांसह भाविकांची मंदिरात मोठी गर्दी होती.

ज्येष्ठ भजनी कलाकार अशोक मनोहर मांद्रेकर यांच्या गायनाने अखंड २४ तासांच्या भजनाला प्रारंभ झाला. यावेळी विविध पार समित्यांतर्फे श्रीचरणी श्रीफळ अर्पण करण्यात आले. संध्याकाळच्या सत्रात विविध पार समित्यांतर्फे पारांचे व गायन मैफलींचे आयोजन करण्यात आले होते.

वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताहाला १२४ वर्षांची परंपरा लाभलेली आहे. संध्याकाळी ६ वाजल्यापासून दिंडीच्या गजरात पार मिरवणुका मंदिराकडे निघाल्या. या दरम्यान प्रत्येक पार समितीतर्फे गायनाच्या मैफलींचे आयोजन केले होते.

त्यानुसार नटराज थिएटर, वास्को टुरिस्ट टॅक्सी स्टॅण्ड, मुरगाव पालिकेसमोर आदी ठिकाणी गायनाच्या बैठका झाल्या. यात महाराष्ट्र व गोव्यातील कलाकारांचे गायन झाले. या गायक कलाकारांना विविध पार समित्यांनी आमंत्रित केले होते.

बैठका पहाटे चार वाजेपर्यंत चालू होत्या. या काळात दिंड्या पारांसहित मंदिराकडे मार्गक्रमण करत होत्या. यंदा गोव्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून भाविकांनी उपस्थिती लावून श्री दामोदर भजनी सप्ताहाचा आनंद लुटला.

मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी घेतले दर्शन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, माजी वीजमंत्री मिलिंद नाईक, उद्योगपती नारायण बांदेकर, शिवानंद साळगावकर, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवान करमली, मुरगावचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख, पोलिस निरीक्षक कपिल नायक आदी मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री देव दामोदराचे दर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT