Mormugao City Dainik Gomantak
गोवा

Mormugao Municipality: वास्कोत परप्रांतीयांकडून फुटपाथवर अतिक्रमण

Mormugao Municipality: कारवाईची मागणी : मुरगाव पालिका 30रुपये गोळा करण्यात मग्न

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao Municipality: मुरगाव पालिकेला 30 रुपये द्या आणि शहरात फुटपाथ तसेच इतर मोक्याच्या ठिकाणी कुठेही दुकान थाटून आपला व्यवसाय थाटा, अशा उक्तीप्रमाणे परप्रांतीयांनी वास्को शहरात आपला व्यवसाय थाटला असून मुरगाव पालिकेच्या वरदहस्ताने चाललेल्या या व्यवसायामुळे वास्कोतील हॉटेल व्यवसायावर गदा आली आहे.

त्यामुळे या परप्रांतीयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ‘विकसित गोवा व स्वयंपूर्ण गोवा’चा परप्रांतीयांनी उत्तम लाभ घेतल्याचे वास्कोत ज्वलंत उदाहरण पाहावयास मिळत आहे. मुरगाव पालिका ३० रुपये गोळा करण्यात मग्न आहे. मात्र, कारवाई करण्यात शून्य आहे.

वास्को शहरात मोक्याच्या ठिकाणी परप्रांतीयांनी आपला व्यवसाय मांडून फुटपाथ तसेच रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

परप्रांतीयांनी वास्को शहरातील फुटपाथवर अतिक्रमण करून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

परप्रांतीयांना ज्या जागेवरून हटविण्यात आले होते ती आता पालिकेने परत परप्रांतीयांना दिलेली पाहून स्थानिक व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. ते आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Teachers Recruitment: गोव्यात NEP ची होणार प्रभावी अंमलबजावणी! शाळांमध्ये 1008 शिक्षक, 377 इन्स्ट्रक्टर्सची होणार भरती

Goa Nightclub Fire: थंडीत लुथरा बंधूंनी फरशीवर तळमळत काढली रात्र, बर्च बाय रोमियो लेन क्लबच्या मालकांनी कोठडीत केला देवाचा धावा

Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

Horoscope: ग्रहांची शुभ स्थिती! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

SCROLL FOR NEXT