Goa News | Fire  Dainik Gomantak
गोवा

Goa News: फ्लॅटला आग लागून लाखोंचे नुकसान

Goa News: अग्नीशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

दैनिक गोमन्तक

Goa News: मुंडवेल वाडे येथील सेंट ॲण्ड्रयू रेसिडेन्सीमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा संशय घरमालकांनी व्यक्त केला आहे.

आग लागल्याची माहिती वास्को अग्नीशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागली त्यावेळी फ्लॅटमध्ये कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

वास्को-मुंडवेल वाडे येथील सेंट ॲण्ड्रयू रेसिडेन्सीमधील मीनाक्षी नाईक यांच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून धूर येत असल्याचे कळताच, इमारतीत राहणाऱ्या प्रशांती शेट्टी यांनी अग्नीशमन दलाला आग लागल्याची माहिती दिली. ताबडतोब दाखल होऊन अग्नीशमन दलाच्या जवानांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करून आग आटोक्यात आणली.

आगीमुळे हॉलचे व फ्लॅटच्या इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी वास्को अग्नीशमन दलाचे फायर फायटर अमृत मिराशी, सुंदर राऊळ, मंजुनाथ शेट्टी, प्रेमानंद नाईक यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणले. यावेळी वास्को वीज विभागाने इमारतीतील वीज बंद केली. घटनास्थळी वास्को पोलिस उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT