Vishwajit Rane | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'विविधतेतून एकता' या कार्यक्रमातून विश्वजित राणेंची गोवेकरांना साद

Goa News: सर्व धर्माच्या नागरिकांना एकत्र करून विकासाच्या प्रवाहामध्ये सामील करण्याची भाजपची विचारधारा आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News:ाच्या नागरिकांना एकत्र करून विकासाच्या प्रवाहामध्ये सामील करण्याची भाजपची विचारधारा आहे. यामुळे भाजपची यंत्रणा दिवसेंदिवस मजबूत होत आहे. यासाठी येणाऱ्या काळात विविध प्रकारच्या उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री तथा वाळपई मतदारसंघाचे आमदार विश्वजीत राणे यांनी केले.

वाळपई भाजप मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विविधतेतून एकता’ या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. वाळपई येथील त्यांच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते‌. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे प्रभारी विनोद शिंदे, जिल्हा पंचायत सभासद राजश्री काळे, नगरसेवक वसईद्दीन शेख, विनोद हळदणकर, प्रसन्ना गावस, उदय सावंत व इतरांची उपस्थिती होती.

यावेळी विश्वजीत राणे यांनी सांगितले की, वाळपई मतदारसंघामध्ये भाजपच्या सेवा पंधरवड्याला चांगला प्रतिसाद लाभला. ‘विविधतेतून एकता’ हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. यामध्ये विविध राज्यांतील जे बांधव वाळपई मतदारसंघामध्ये वास्तव्य करतात त्यांची पारंपरिकता साजरी करण्याच्या माध्यमातून एकजूट राखण्याचा हा खरोखरच चांगला प्रयत्न आहे.

यावेळी भाजपचे प्रभारी विनोद शिंदे यांनी सांगितले की, अशा उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांना एकत्र येण्याची चांगली संधी प्राप्त होते. भाजपने ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे येणाऱ्या काळात कोणत्याही स्तरावर समाजामध्ये फूट पाडणाऱ्या गोष्टींना कोणी थारा देऊ नये. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय सावंत यांनी केले व आभार मानले.

विविध कार्यक्रमांचे सादरीकरण

यावेळी एकता महिला मंडळ कळसई-उसगाव यांच्यातर्फे दांडिया तसेच सावर्डे बालमंडळातर्फे समई नृत्य सादर करण्यात आले. गवाणे येथील धनगर बांधावांतर्फे गजानृत्य सादर करण्यात आले. तर वाळपई भागातील राजस्थानी समाजातर्फे समाजाची पवित्र मानली जाणारी पगडी विश्वजीत राणे यांना प्रदान करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT