Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: ...अखेर वाळपईतील खान यांच्या बंगल्यावर प्रशासनाचा हातोडा; बंगला जमीनदोस्त करण्यास 4-5 दिवस लागणार

Illegal construction: बंगला पाडण्यासाठी 3 वेळा कारवाई, मात्र आज प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात

Ganeshprasad Gogate

Illegal construction: गेल्या एक वर्षापासून गाजत असलेल्या वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग, 9 मधील म्हाऊस मार्गावरील मुबारक अली खान यांच्या बेकायदेशीररित्या बांधलेल्या बंगल्यावर आज मंगळवारी अखेर वाळपई नगरपालिकेने धडक कारवाई करत बंगल्यावर हातोडा मारण्यास सुरुवात केली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज मंगळवारी 12 मार्च रोजी सकाळपासून बंगला पाडण्याबाबत कारवाई करण्यात आली.

गेल्या एक वर्षापासून हा बंगला पाडण्यासाठी 3 वेळा कारवाई करण्यात आली होती. मात्र अनेक घडामोडीनंतर आज प्रत्यक्षात ही कारवाईला सुरुवात झाली आहे.

यावेळी सविस्तर वृत्त असे की, मुबारक अली खान यांच्या विरुद्ध 2017 मध्ये अमीना बी शेख, शमसुद्दीनीशा खान, बद्रुनीशा खान, आफताब खान आदींनी बेकायदेशीर बांधकामाविरुध्द न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार 2017 पासुन खटला सुरु झाला होता.

त्यानंतर हा खटला नगर नियोजन खात्याकडे गेल्यानंतर 2018 मध्येच न्यायालयाने घर पाडण्याचे आदेश दिले होते.

मात्र हा खटला उच्च न्यायालयात गेल्याने घर पाडण्यास स्थगिती मिळाली होती. त्यानंतर गेल्या वर्षी 27 जानेवारी 2023 रोजी घर पाडण्यास सुरुवात केली होती.

मात्र पुन्हा खान कुटुंबीयांनी बंगला पाडल्यांस न्यायालयाकडून स्थगिती आणली. त्यानंतर 6 फेब्रुवारी 2024 ला पुन्हा न्यायालयाने बंगला पाडण्याचे आदेश देण्यात आले होते.

यावेळी खान कुटुंबीयांनी विनवणी करत काही दिवसाची मुदत मागितली होत. मात्र दिलेल्या हमीवर काहीही न झाल्याने अखेर आज मंगळवारी नगरपालिकेने कारवाई करण्यात सुरुवात केली.

सकाळच्या सत्रात खान कुटुंबीयांनी घरातील सामान काढले नव्हते. मात्र घरात सामान असताना दुसऱ्या बाजुने घर पाडण्यास सुरुवात केली. त्यांतर घरातील सामान बाहेर काढण्यात आल्यानतंर दुपारी 3 च्या सुमारास बंगल्यावर बुल्डोझर चालवण्यात आला.

बंगला जमीनदोस्त करण्यात 4-5 दिवस लागणार :-

दरम्यान गेल्या एक वर्षापासून सर्वत्र हे प्रकरण गाजत असुन अनेक वेळा बंगला पाडण्याचा आदेश जारी करुन सुध्दा पुन्हा पुन्हा त्यांना स्थगिती मिळत होती. मात्र आज उच्च न्यायालयाचा आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

आणखीन 4-5 दिवसात बंगला जमीनदोस्त करण्यासाठी कालावधी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यावेळी वाळपई नगरपालिका मुख्याधिकारी सुर्याजीराव राणे, संयुक्त मामलेदार सुरेंद्र गावकर, पालिका अभियंता हरिष, वाळपई पोलिस निरिक्षक राहुल नाईक तसेच पालिकेतील कर्मचारी व मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT