Black Rice Production Dainik Gomantak
गोवा

Black Rice Production in Valpoi: वाळपईत बालचमूंनी अनुभवली ‘काळ्या भाता’ची लावणी

हळदणकर यांचा यंदा प्रयोग ः पारंपरिक शेती जपण्याचा प्रयत्न प्रेरणादायी

गोमन्तक डिजिटल टीम

Black Rice Production in Valpoi सत्तरी ही कृषी प्रधान आहे, यात विविध प्रकारे शेती केली जाते. पूर्वी सत्तरीच्या अनेक भागात पारंपरिक पध्दतीने भात लागवड केली जायची. त्यात पावसाळी व पुरण शेतीचा समावेश होता.

मात्र, कालांतराने नदीवर जलस्त्रोत खात्याचे बंधारे बांधल्यानंतर पारंपरिक व शेकडो वर्षांपासून सुरु असलेली पुरण शेती पडद्याआड गेली आहे.

त्यात पावसाळी शेतीही करणे कमी होत आले आहे.शेती क्षेत्र घटत असतानाही वाळपईतील हळदणकर कुटुंबीयांनी वडिलोपार्जित शेती जपली असून यंदा प्रायोगिक तत्‍वावर काळ्या भाताची लावण एका एकरात केली आहे.

शेतीकडे होत असलेल्या दुर्लक्षास अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे शेती आर्थिक दृष्ट्या परवडणारी नाही, तसेच सरकाच्या स्वस्त धान्य वितरण योजनेमुळे शेतमजूर मिळत नसल्याने अनेकांनी शेती करणे सोडून दिले आहे.

मात्र, कृषी खाते शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनवण्यास पुढे येत असल्याने अनेकजण शेतीकडे वळत आहेत.

पूर्वी तुकाराम हळदणकर यांचे आजोबा शेती करायचे त्यानंतर त्यांचा वारसा माजी आमदार नरहरी हळदणकर यांनी जपला, आता त्यांचा मोठा नातू तुकाराम हळदणकर हे जपत आहेत. टॅक्टरने शेतीची मशागत सुरू आहे, तर दुसरीकडे भाताची लावणी सुरू आहे.

‘श्री हनुमान’च्या मुलांनी गिरवले शेतीचे धडे

वाळपई येथील श्री हनुमान प्राथमिक शाळेच्या मुलांनी व शिक्षकांनी आज (शुक्रवारी) हळदणकर यांच्या शेतात भेट देऊन शेतीकामाचा आनंद लुटला. पहिली ते चौथीच्या मुलांनी तरवा कशा लावाव्यात, मेर कशी करावी, मातीत कसे उतरावे असे अनेक अनुभव घेतले.

यावेळी शिक्षिका मंजुळा नाईक, रुपा वझे, सत्यवान गावकर, सुधीर गावकर तसेच शेतकरी तुकाराम हळदणकर यांनी मुलांना शेतीची माहिती दिली.

काळ्या तांदळाचे महत्व:

तामिळनाडू कृषी विद्यापीठाने काळ्या तांदळाची एक नवीन जात शोधून काढली आहे. ‘कवुनी सीओ ५७’ असे या नवीन जातीचे नाव असून या काळ्या तांदळाची उत्पादनक्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असून हा तांदूळ मधुमेहींसाठी पौष्टीक मानला जातो.

काळ्या तांदळाचे हेक्‍टरी ४६ क्विंटल इतक उत्पादन मिळणार आहे. गोव्यात ज्योती व गोवा धान (करजत) याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. वाळपई येथील तुकाराम हळदणकर तर दुसरे मलपण येथील विठोबा सावंत या दोन शेतकऱ्यांनी काळ्या तांदळाची प्रात्यक्षिक तत्वावर शेती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT