Sunburn Festival Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2023: ‘सनबर्न’ची कडक तयारी; ध्वनिप्रदूषण-ड्रग्सविरोधी मोहीमेसाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

Sunburn Goa 2023: पथकांची निर्मिती : खंडपीठाच्‍या दणक्‍यानंतर प्रशासनाने बाह्या सरसावल्‍या

दैनिक गोमंतक वृत्तसेवा

Sunburn Goa 2023: खंडपीठाने दिलेल्‍या दणक्‍यामुळे 28 ते 30 डिसेंबरला वागातोर येथे होणाऱ्या ‘सनबर्न’ फेस्टिव्हलमध्ये ध्‍वनिप्रदूषण तसेच अमली पदार्थांचा वापर रोखण्‍यासाठी पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेने बाह्या सरसावल्‍या आहेत.

ड्रग्जचा वापर रोखण्यासाठी पोलिसांची विशेष शोध पथके स्थापन करण्यात येत आहेत. फेस्टीव्हलमध्ये अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्‍यात येणार असून, तपासासाठी साध्या वेशातील पोलिसही तैनात केले जातील, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी आज दिली.

यापूर्वी पर्यावरण खात्याने सनबर्न तसेच मोठ्या इव्हेंट्सना परवानगी देण्यासाठी विशेष विभाग स्थापन केला आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, पोलिस अधीक्षक व संबंधित भागातील उपजिल्हाधिकारी हे सदस्य आहेत.

या आदेशामध्ये परवानगी देताना तीन बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. या विभागाची बैठक लवकरच होईल व त्यावेळी सनबर्न ईडीएम फेस्टीव्हलच्या काळात ध्वनिप्रदूषणप्रकरणी आवश्‍यक त्या उपाययोजना तसेच तेथे तीन दिवस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनाची अशी असेल तयारी:-

1. सनबर्नस्‍थळी पोलिसांबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही उपस्थित असतील.

2. सनबर्नच्या म्युझिक सिस्टिमचा आवाज त्यांना देण्यात आलेल्या परवानगीपेक्षा वाढल्यास त्याची मोजमाप करणारी यंत्रे मंडळातर्फे तेथे बसवण्यात येणार आहेत.

3. त्यामुळे जे गेल्यावर्षी उल्लंघन झाले, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तीनही दिवस पोलिस व मंडळाचे अधिकारी काळजी घेतली.

4. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्वरित म्युझिक सिस्टीम जप्त करण्यात येईल, असेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT