Goa Vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये वाढ

गोव्यात (Goa) नव्या कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोना (Covid-19) प्रतिबंधक लसीच्या (Vaccinae) दोन डोसमधील अंतर वाढवल्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मागील महिन्यात कमी होती. मात्र, आता हे अंतर संपल्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या पहिला डोस घेणाऱ्यांपेक्षा जास्त होत आहे. गेल्या पाच दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास हे स्पष्ट होत.

आहे. दुसरीकडे राज्यात (Goa) कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात येत असून नव्या कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.

१० ते १४ ऑगस्ट लसीकरण

राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असली तरी संचारबंदी (कर्फ्यू) उठविण्यास सरकार अजूनही राजी नाही. अजूनही तिसऱ्या लाटेचे संकट असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून संचारबंदी आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कॅसिनो व स्पा तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भात सध्या तरी कोणताच विचार सरकारचा नाही.

गेल्या मे महिन्यापासून सरकारने ही मर्यादित संचारबंदी लागू केली आहे. वारंवार ही संचारबंदीची मुदत वाढवताना त्यामधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेत झाले त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारही धोका पत्करत नाही. ही संचारबंदी मुदतवाढ करताना विवाह सोहळे तसेच इतर कार्यक्रमांसाठी सध्या ५० लोकांना उपस्थिती लावण्यास परवानगी आहे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मात्र इतर सर्व निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू असतील.

रविवारची आकडेवारी

कसिनो बंदच

गेल्या मार्च 20 मध्ये कसिनो, स्पा व मसाज पार्लर तसेच सिनेमा हॉल बंद झाले आहेत ते अजूनही सुरू करण्यात आलेले नाही. इतर काही व्यावसायिकांना काही अटी व निर्बंध घालून व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिली आहे. सभागृहे, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, करमणूक उद्याने, थिएटर, मल्टिप्लेक्स, मनोरंजन झोन खुले न केल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT