Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: पश्चिम बगल रस्त्याविरुद्ध आंदोलन

बाणावलीवासीय एकवटले: उद्या न्यायालयात जाण्याचा निर्धार

दैनिक गोमन्तक

सासष्टी: पश्र्चिम बगल रस्त्याचे काम जे पूर्ण जोरात सुरू झाले आहे, त्याला विरोध करीत बाणावलीच्या नागरिकांनी आज सकाळी आंदोलन पुकारले. शेकडो नागरिक येथे जमले. त्यात बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश, आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर, पर्यावरणवादी सिद्धार्थ कारापुरकर, बाणावली पंचायतीच्या पंच फेलिसिसा नोरोन्हा उपस्थित होत्या.

आमदार वेन्झी व्हिएगश यांनी आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीच्या दिवसात पश्र्चिम बगल रस्त्याचे काम सुरू आहे, त्याला विरोध दर्शवला. नागरिकांना न्यायालयात जाण्याची संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सोमवारी बाणावली पंचायतीत जाऊन त्यांनी जो ठराव घेतला आहे त्याचा अभ्यास करून पुढील कारवाई केली जाईल व न्यायालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आमदार व्हिएगश यांनी सांगितले.

बाणावलीच्या पंच फेलिसिया नोरोन्हा यांनी सांगितले, की पंचायतीने दोन ठराव मंजूर केले आहेत. एक यासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी वकिलाची नियुक्ती व दुसरा ठराव कामाला स्थगिती मिळविण्यासाठी आहे. आम्ही पंचायतीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माजी मंत्र्याची भेट घेतली होती व त्यांनी यासंदर्भात योग्य विचार करण्याचे आश्र्वासन दिले होते. दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीची माहिती दिली होती. केवळ पंचायतीने पुढाकार घेऊन भागणार नाही. शेतकऱ्यांनीही पुढे यायला पाहिजे. पंचायतीने अॅड. धवल जव्हेरी यांची नियुक्ती केली असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणवादी सिद्धार्थ कारापुरकर यांनी सांगितले की आमचा बायपास रस्त्याला विरोध नाही, पण हा रस्ता स्टिल्टवर बांधलेला आम्हाला हवा आहे.

शेतीत भराव टाकण्यास विरोध

पंचायतीने यापूर्वी या कामाच्या विरोधात पावले उचलायला पाहिजे होती, पण माजी आमदाराने या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, असे आमदार वेन्झी व्हिएगश म्हणाले. पश्र्चिम बगल रस्त्यासाठी शेतामध्ये मातीचा भराव टाकण्याचे काम चालू असल्यामुळे पावसाऴ्यात पूर येण्याची भीती आहे. त्यासाठी हे आंदोलन असल्याचे व्हिएगश यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT