Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळीचा तडाखा! सत्तरीत घरावर झाड कोसळले; 40 सुपारी आणि 60 केळीची झाडे मोडली

Nanoda Bambarde House Damage: राज्यात शुक्रवारी अवकाळी पावसाने विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.

गोमंतक ऑनलाईन टीम

राज्यात शुक्रवारी अवकाळी पावसाने विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने घरांचे नुकसान झाले, तर रस्त्यांवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली व शेतीची कामे खोळंबली आणि किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायालाही फटका बसला.

वाळपई सत्तरी तालुक्यात शुक्रवारी दुपारनंतर अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी जोरदार तडाखा दिला. नगरगाव पंचायत क्षेत्रातील नानोडा-बांबर, दरोडे, साट्रे आणि माळोली परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. नानोडा-बांबर येथे नारायण गावकर यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या बागायतींनाही मोठा फटका बसला.

शेतकरी विष्णू जोशी यांच्या बागायतीतील ४० सुपारीची आणि ६० केळीची झाडे, तसेच नारळाची झाडे मोडून पडली. मिलिंद बर्वे, प्रशांत मराठे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या बागायतींचेही नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचा एकत्रित तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही.

शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी ४ नंतर आकाशात काळोख दाटून आला. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह काही भागांत जोरदार, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. नगरगाव पंचायत क्षेत्रात वादळी वाऱ्यांचा जोर अधिक असल्याने पाच ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळली. काही झाडे वीजवाहिन्यांवर पडल्याने वाहतुकीसह वीज यंत्रणेवरही परिणाम झाला.

अग्निशमन दलाचे मदतकार्य

घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन झाडे हटविण्याचे आणि मदतकार्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. अंधारामुळे नुकसानीचा संपूर्ण तपशील मिळू शकला नाही. अवकाळी पावसामुळे भातशेतीलाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले.

हरमलात पर्यटकांनी लुटला आनंद

हरमलमध्ये शुक्रवारी सायंकाळी २० ते २५ मिनिटे धुवांधार पाऊस पडल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली. दसऱ्यानिमित्त देवतांच्या तरंगा व पालखी भेटींचे कार्यक्रम सुरू असल्याने भाविकही चिंतेत आहेत. किनाऱ्यावरील शॅक उभारणीची कामे पावसामुळे खोळंबली असून, मजूर परतल्याने नुकसान झाल्याचे व्यावसायिक रामचंद नाईक यांनी सांगितले. दरम्यान, पर्यटकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic Management: पणजीला स्मार्ट सिटीचा दर्जा, पण पार्किंगचा पत्ता नाही! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बहुमजली वाहनतळ हवाच

Inflation Hike 2026: साबण, चॉकलेटपासून मोबाईल रिचार्जपर्यंत... सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; कच्चा माल महागल्याने महागाईचा उडणार भडका

Sameera Reddy Goa House: 4,000 स्क्वेअर फूटमध्ये सुंदर आशियाना, भोवताली हिरवळच हिरवळ; समीरा रेड्डीच्या गोव्यातील आलिशान घराची खास झलक VIDEO

8th Pay Commission Updates: फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्याचे गणित बदलणार? मुंबईतील बैठकीनंतर मोठे संकेत; पगारवाढीचा नवा फॉर्म्युला ठरणार?

Political Party Loyalty: 'पक्षबदलूंना उमेदवारी म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा'; सुदिन ढवळीकरांचा सल्ला, एकनिष्ठ कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT