Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळी पावसाचा तडाखा; सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी पडझड! सत्तरी, डिचोली आणि पेडण्यात झाडे उन्मळून पडल्याने घरांचे मोठे नुकसान

Goa Weather Forecast IMD: राज्याच्या विविध भागांत आज सायंकाळी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. सत्तरी, डिचोलीसह पेडण्यातही काही ठिकाणी पडझड झाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्याच्या विविध भागांत गुरुवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. सत्तरी, डिचोलीसह पेडण्यातही काही ठिकाणी पडझड झाली. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे बोर्डे आणि मुळगाव येथे दहा ते बारा दुचाकी घसरून पडल्या. दोन्ही ठिकाणी जांभळे पडल्यामुळे रस्ता चिकट बनला होता. त्यातच सायंकाळी पडलेल्या पावसामुळे निसरट निर्माण झाली. या घटनेत आठ ते दहाजण जखमी झाले. यावेळी तिघाजणांना गंभीर दुखापत झाली, तर अन्य किरकोळ जखमी झाले. मात्र, जीवितहानी टळली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने बोर्डे येथे जाऊन पाणी मारून रस्ता स्वच्छ केला.

तर मुळगाव येथे स्थानिकांनी रस्त्यावर माती टाकून वाहतूक सुरळीत केली. दोन्ही ठिकाणी काही वेळ वाहतूक कोंडीही झाली.राज्याच्या बहुतांश भागांत सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस (Rain) पडला. हिवरे-बुद्रुक येथे वाऱ्यामुळे झाडे पडून अनेक घरांचे नुकसान झाले. घरांवर झाड पडणे, पत्रे, कौले उडून जाण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलातर्फे मदतकार्य सुरू होते. दरम्यान, राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यात मागील दोन आठवड्यांपासून होरपळून काढणारे उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झाले होते. मात्र, सत्तरी, डिचोली आणि पेडणे तालुक्यातील काही भागांत संध्याकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आणि गारवा पसरला. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत पडलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला.

यंदाचे सर्वाधिक तापमान ‘३६.५’

यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान बुधवारी ३६.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. गुरुवारी राज्यात ३६.२ अंश सेल्सियस तापमान होते. किमान २६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून कमाल तापमानात २.४ अंशांनी नोंद करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून कमाल तापमान ३६ अंशांवर असून काल सर्वाधिक ३६.५ एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT