Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Unseasonal Rain: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण! शनिवारी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

Unseasonal Rain: राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण होत असून घामाच्या धारा लागत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण होत असून घामाच्या धारा लागत आहेत.

पुढील काही दिवस तापमानाचा पारा ३४ किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यात शनिवारी काही भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

शुक्रवारी राज्यात कमाल ३४.२ अंश सेल्सिअस तर किमान २३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सामान्य तापमानाच्या तुलनेत तापमान १.२ अंशांनी वाढले होते. त्यासोबतच, कमाल ८९ टक्के इतकी आर्द्रता नोंदविण्यात आली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत १२ टक्के अधिक होती.

१.२ मिमी पावसाची नोंद

गुरूवारी राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला. राज्यात सरासरी १.२ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. सांखळी येथे ६.२ मिमी, धारबांदोडा ४.२ मिमी, वाळपई २.५ मिमी, सांगे २.३ मिमी, आणि जुने गोवा येथे १.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT